पाऊस LIVE : मुंबईत पावसाची संततधार, राज्यभरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम आहे. राज्यातील विविध भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा असली, तरी सरीवर सरी बरसत असल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

पाऊस LIVE : मुंबईत पावसाची संततधार, राज्यभरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा
Follow us
| Updated on: Jun 29, 2019 | 12:28 PM

मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम आहे. राज्यातील विविध भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा असली, तरी सरीवर सरी बरसत असल्याने शेतीकामांना वेग आला आहे. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं, तर अंधेरी-गोरेगावात वीजेचा शॉक लागल्याने तिघांचा मृत्यू झाला. पावसाचा जोर आज सकाळपासून कायम आहे. मुंबईसह वसई-विरार, ठाणे-कल्याण, शहापूर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढलं आहे. एकीकडे हे चित्र असलं, तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

[svt-event title=”विक्रोळीत संरक्षक भिंत कोसळली” date=”29/06/2019,12:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पावसाची संततधार” date=”29/06/2019,11:18AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. गगनबावडा परिसरामध्ये अतिवृष्टी, धरण क्षेत्रात पाणी सठ्यात वाढ. जिल्ह्यात 24 तासात 18. 77. मी मी पावसाची नोंद. सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.हातकणंगले, शिरोळ तालुक्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांत आनंद [/svt-event]

[svt-event title=”मुंबई शहरात गेल्या 12 तासात 127 मिमी पाऊस” date=”29/06/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] • पश्चिम उपनगर 170 मिमी • पूर्व उपनगर 197 मिमी • कुलाबा 51.8 मिमी • संताक्रूज 217 मिमी [/svt-event]

[svt-event title=”धरण क्षेत्रात जोरदार पाऊस” date=”29/06/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात आतापर्यंत झालेला पाऊस • तानसा – 266 मिमी • विहार – 640 मिमी • तुळशी – 750 मिमी • मध्य वैतरणा – 287 मिमी • मोडकसागर 364 मिमी • भातसा , 358 मिमी • अप्पर वैतरणा , 221 मिमी गेल्यावर्षी सर्व तलावात आजच्या दिवशी 28 टक्के पाणी जमा झालं होतं, ते यंदा 19 टक्के जमा झालं आहे. [/svt-event]

[svt-event title=”कल्याणच्या दुर्गाडी पुलाच्या सांध्याला तडे” date=”29/06/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ] कल्याणच्या दुर्गाडी पुलाच्या सांध्याला तडे. कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबईला जाण्यासाठी महत्वाच्या पुलाला तडे, रोज हजारो गाड्यांची पुलावरुन ये जा [/svt-event]

[svt-event title=”कोकणात मुसळधार पाऊस” date=”29/06/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- सलग चौथ्या दिवशी कोकणात मुसळधार पाऊस. रत्नागिरी सिंधुदुर्गाला रात्रीपासून पावसाने झोडपले. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीत पाऊस. पावसाने कोकण रेल्वेच्या गाड्या अर्धा तास उशिरा. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी [/svt-event]

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.