Video : भर दुपारी संध्याकाळ सारखा अंधार! अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ
विजांच्या कडकडासह ढगांच्या गडगडाटाने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला! दमदार पावसाची हजेरी
मुंबई : परतीच्या पाऊस लांबला असला तरी या पावसाचा (Rain Update) जोर अनेकांची तारांबळ उडवतो आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह मुसळधार पावसाने (Mumbai rains) अचानक हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर गुरुवारी भर दुपारी संध्याकाळ सारखा अंधार दाटून आला होताच. अचानक काळे ढग दाटून आल्यानं विजांच्या कडकडात (Rains with Lightening) जोरदार पावसाने हजेरी लावली.
कुठे कुठे पाऊस?
मुंबईच्या सायन, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला परिसरात ढगाळ वातावरण सकाळपासूनच होतं. मात्र अचानक दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली.
दुपारी 2.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईचा उत्तर आणि दक्षिण भाग, तसंच नवी मुंबई, रायगड भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगटात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
It’s raining heavily in Chunabhatti, Mumbai.#MumbaiRains #rains pic.twitter.com/6tiCd4nSYI
— Rohit Gajakos (@5cacd5b4f279443) October 13, 2022
मुंबईच्या करी रोड, परेल, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागात पाऊस सुरु झाला. या पावसाचा मुंबईच्या वेगावर परिणाम झाला नसला, तरी अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची तारांबळ उडवली होती.
Some intense spell of heavy to very heavy rains already in south mumbai — rest of Mumbai to get soon. #MumbaiRains pic.twitter.com/jBBsUclPzY
— Weatherman of Mumbai (@RamzPuj) October 13, 2022
पुढचे काही तास पावसाचे
दरम्यान, पुढच्या काही तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवी मुंबईतही जोरदार
मुंबई प्रमाणेच नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नवी मुंबईतही परतीच्या पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालंय.
Heavy rain is lashing over Navi Mumbai due to Thunderstorm. Thunder storm will give heavy showers and lightning to South-Mumbai.#MumbaiRains pic.twitter.com/4KU5PbHqbe
— WeatherMan of Thane (@UmredkarBhupen) October 13, 2022
पुण्यातही मुसळधार
मुंबई, नवी मुंबईसह पुण्यातही आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात आजही मुसळधार पावसाची जोर कायम राहील ,अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.