मुंबईकरांना अजून किती दिवस पाऊस भिजवणार? हवामान विभागाचा अंदाज समोर!

दिवाळीतही पाऊस धुमाकूळ घालणार का? ऐन सणासुदीच्या दिवसांतही मुंबईत पावसाच्या सरी बरसणार? हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबईकरांना अजून किती दिवस पाऊस भिजवणार? हवामान विभागाचा अंदाज समोर!
मुंबई अजून किती दिवस पाऊस?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 11:14 AM

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : शुक्रवारपासून सुरु झालेल्या मान्सूनच्या (Monsoon Rain Update) परतीच्या प्रवासाला आणखी विलंब होण्याची शक्यताय. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या पुढच्या पाच दिवसांच्या अंदाजात, मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस (Mumbai Rain Alert) होण्याची आशंका व्यक्त करण्यात आलीय. विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडासह मुंबईत आजपासून पुढचे 3 दिवस पावसाची शक्यताय. त्यामुळे येणारा आठवडाही पावसाच्या सरींसोबत मुंबईकरांना घालवावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसोबत ठाणे, पालघरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

गेल्या वर्षी 14 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा पाऊस मुंबईतून परतला होता. मात्र यंदा पावसाचा मुक्काम लांबलाय. सरासरी 8 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतून मान्सूनचा पाऊस नाहीसा होतो. पण यंदा चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालंय. ऑक्टोबर महिन्यात 18 ऑक्टोबरपर्यंत मुंबई पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलंय.

मध्य महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे नंदुरबारमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही परतीच्या पावसाला पुढील तीन दिवसांत सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव घडामोडी : Video

ऑक्टोबरमधील विक्रमी पाऊस

शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत संध्याकाळी साडे चार नंतर दमदार पावसाला सुरुवात झाली होती. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला होता. तर दुसरीकडे या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

2022 या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत तब्बल 167 मिमी पावसाची नोंद झालीय. गेल्या दहा वर्षातला ऑक्टोबर महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस असल्याची आकडेवारी समोर आलीय.

विमान वाहतुकीवर परिणाम

लांबलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम मुंबईच्या विमान वाहतुकीरवही झालाय. मुंबईत विमानांचं लॅन्डिंग पावसामुळे विलंबाने झालं. 8 विमानांच्या लॅन्डिंगवर विजांच्या कडकडाटासोबत ढगांच्या गडगडाटाने परिणाम झाला. काही विमानं मुंबईऐवजी दुसरीकडे वळवण्या आली होती.

एअर इंडियाचं गोवा आणि चेन्नईहून येणार विमान, दिल्ली आणि बँकाँकहून येणारं विस्तारा कंपनीचं विमान, सोबतच इंडिगो आणि कतार एअरलाईन्सची दोन विमानांच्या वेळापत्रकावर पावसामुळे परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.