मुंबई : मुंबईमध्ये कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईतील अंधेरी भागातही काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. पहिल्याच पावसामुळे अंधेरीतील सबवे पाण्याखाली गेलाय. अशात एक महिला रस्ता ओलांडत असताना वाहून जाऊ लागली. पण उपस्थित असलेल्या चौघांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले.
काल जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अंधेरीतील सबवे परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. पाणी वेगाने पुढे सरकत होतं. अशात एक महिला रस्ता ओलांडू लागली. पण या पाण्याच्या वेगामुळे ती वाहून जाऊ लागली. पण इतक्यात तिथं असणारे लोक तिच्या मदतीला आले. तिथे असलेल्या दोघांनी तिला पकडलं. अन् रस्त्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. अशात तिथीन चाललेल्या कारमधून एक व्यक्ती उतरला तोही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलेचा अखेर जीव वाचला.
हे वाहतं पाणी या महिलेच्या जीवावर बेतलं होतं. पण उपस्थितांनी मदत केली. त्यामुळे तिचा जीव वाचला. पाण्यातून बाहेर आल्यानंतर ही महिला घाबरलेली होती. उपस्थितांनी दिली धीर दिल्याने ती स्थिर झाली. या महिलेने तिला मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले. तुमच्यामुळे मी व्यवस्थित आहे, सगळ्यांचे आभार, असं ही महिला म्हणाली.
मुंबईतील मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले परिसरात काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं.
मुंबईतील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचू नये, यासाठी पालिकेने पावसाआधीच तयारी केली.मुंबईतील मालाड, अंधेरी आणि मिलन सबवेजवळ बीएमसीने पंपिंग मशीन बसवल्या आहेत.पाऊस सुरू होताच हे पंपिंग मशीन सुरू केलं जातं आणि भुयारी मार्गात साचलेले पाणी हे मशिन बाहेर काढण्यात येतं. या प्रकारच्या पंपिंग मशीन भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला बसवण्यात आल्या आहेत. मात्र तरिही दरवर्षी प्रमाणे यंदाही या भागात पाणी साचतं आहे, त्यामुळे नागरिकांकडून मात्र संताप व्यक्त होतोय.