Mumbai rains : पनवेलपासून पालघरपर्यंत, मुंबईपासून विरारपर्यंत, पाऊसच पाऊस! हे फोटो बघाच

Mumbai Rains : कुठे स्कूल बस पाण्यात अडकली. कुठे रस्त्यावरुन चालवली जाणारी बाईक रस्त्यावरच्या पाण्यातून ढकलून न्यावी लागली

Mumbai rains : पनवेलपासून पालघरपर्यंत, मुंबईपासून विरारपर्यंत, पाऊसच पाऊस! हे फोटो बघाच
मुंबईत मुसळधारImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 2:27 PM

मुंबई : मुंबईकरांची (Mumbai Rains) मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. रस्ते जलमय झालेत. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेत. वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुंबईत मान्सून (Mumbai Monsoon alert) आलाय, हे सिद्ध करणारी दृष्यंही समोर आली. कुठे स्कूल बस पाण्यात अडकली. कुठे रस्त्यावरुन चालवली जाणारी बाईक रस्त्यावरच्या पाण्यातून ढकलून न्यावी लागली. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, सर्वदूर धुव्वाधार पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडवली. लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना मुंबईच्या (Mumbai News) पहिल्या मुसळधार पावसाने दणका दिलाय. याच पावसात लोकांची तारांबळ उडवणारे काही फोटो समोर आले आहेत. त्यावरही एक नजर टाकावीच लागेल. मुंबईमध्ये शुक्रवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून झालेल्या पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात काय स्थिती झाली आहे, चला एक नजर टाकुयात…

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Siddhesh Sawant (@ssidsawant)

उल्वेमध्ये रस्त्याला नदीचं रुप

उल्वेमध्ये रस्त्याला नदीचं रुप आलंय. हेल्मेट घालून बाईकवरुन बसून ज्या रस्त्यावरुन जायचं, त्या रस्त्यावर तळं झाल्यानं बाईक ढकलून नेण्याची नामुष्की दुचाकीस्वारांवर आली. फक्त उलवेच नव्हे तर पनवेलपासून पालघरपर्यंत आणि मुंबईच्या महालक्ष्मीपासून ते अगदी मीरारोडपर्यंत रस्त्यांवर पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सायन जलमय

सखल भागात असलेल्या सायन रेल्वे स्थानकाला पावसाचा फटका बसलाय. सायन दरम्यान, रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. मध्ये हार्बरची लोकलसेवा विस्कळीत झाली. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या लोकलही उशिराने धावत आहेत.

सखल भागत पाणीच पाणी

हायवेवरील अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसलाय. रस्त्यांच्या कडेला पाणी साचल्यानं वाहनांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलंय.

सब-वे पाण्याखाली

अंधेरी सबवेसह अनेक सब-वे जलमय झाले आहेत. त्यामुळे सब-बेच्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही भागात सब-नेची वाहतूक पर्यायी मार्गाननं वळवण्यात आली आहे.

गाड्या बंद पडल्या

अनेक भागात पावसात गाड्या बंद पडण्याच्या घटना घडत असतात. याही पावसात अशा घटनांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे इकते विक्रोळी दरड कोसळण्याचीही घटना नोंदवली गेली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाचा पावसाचे लाईव्ह अपडेट्स : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी! पावसामुळे कुठे काय स्थिती : LIVE Updates

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.