रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Ram Shinde on Meeting With Devendra Fadnavis : भाजप नेत्यांची 'सागर' बंगल्यावर महत्वाची बैठक; कोणते नेते उपस्थित होते? देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? राम शिंदे शिंदे यांनी या बैठकीबाबत महत्वाची माहिती दिली. वाचा सविस्तर...

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 9:54 AM

लोकसभा निवडणूक होत आहे. अशात राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. मुंबईत काल रात्री उशिरा भाजपची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला अहमदनगरमधील भाजपचे नेते उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंदे सागर बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर बैठकीला उपस्थित होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणिस भाजप नेते हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राम शिंदे यांमी सविस्तर प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर लोकसभेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानी बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे जायची इच्छा होती. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. त्या जागेसाठी इच्छुक होतो. आता अडचणीचं निराकरण झालं आहे, असं राम शिंदे म्हणाले.

अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल दुःख आहे ते कोणीतरी समजून घेतलंय त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. अहिल्या नगरचा भाजपचा खासदार झाला पाहिजे. यादृष्टीने बैठक सकारात्मक बैठक झाली, असं राम शिंदे म्हणाले.

नाराजीच्या चर्चांवर शिंदे काय म्हणाले?

राम शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यावर पक्षीय पातळीवर वाद मिटले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात. पक्षाने दिलेला आदेश मानून अबकी बार 400 साठी आम्ही तयार आहोत, असं राम शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस व्हेटो वापरला का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाही… माझ्यावर व्हेटो वापरायची गरज नाही. पक्षात आदेश हा शिरसावंद्य असतात. मागील पाच वर्षाच्या काळातील इतंभुत चर्चा झाली. आजची बैठक यशस्वी झाली. गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं, असं राम शिंदे म्हणाले.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.