काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा, सुनीत वाघमारे यांना अटक

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. (rape case sunit waghmare congress leader raju waghmare)

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा, सुनीत वाघमारे यांना अटक
सुनीत वाघमारे
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 10:57 AM

मुंबई : काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे ( Raju Waghmare) यांचे भाऊ सुनीत वाघमारे (Sunit Waghmare) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी केली अटक केलीये. सुनीत वाघमारे यांच्यावर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय. (Mumbai rape case registered against Sunit Waghmare who is brother of Congress leader Raju Waghmare )

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांच्यावर मुंबईच्या भोईवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपासासाठी हा गुन्हा लोणावळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुनीत वाघमारेंचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही

दरम्यान, राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यबर खळबळ उडाली आहे. सुनीत वाघमारे यांच्या अटकेची काँग्रेसने दखल घेतली आहे. सुनीत यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलंय. याबाबतचे ट्विट काँग्रेचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

“काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे संदर्भात भाजप फार चिंतन करीत असल्याचे समजते. मात्र, सुनीत यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. 2017 साली मुंबई मनपा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे सुनीत त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.” असे सचिन सावंत यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीमाना

पूजा चव्हाणा आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीमाना दिला. हा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. 28 मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर तो उद्धव ठाकरे यांनी लगेच स्वीकारला. राजीनामा स्वीकारल्याची  माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघीडच्या एका मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. हा मुद्दा भाजपने लावून धरला होता. त्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या भावावर बलात्काराचे आरोप झाले आहेत.

इतर बातम्या :

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

Sanjay Rathod | संजय राठोड राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील ‘राजकीय गुरु’च्या भेटीला

(Mumbai rape case registered against Sunit Waghmare who is brother of Congress leader Raju Waghmare )
Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.