मला बोलता येतं…; लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर नेमकं काय म्हणाले?

Ravindra Waikar on Mumbai North West Lok Sabha Candidature : मुंबई उत्तर पश्चिममधून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच रविंद्र वायकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी वरिष्ठांचे... विरोधकांच्या आरोपांनाही रविंद्र वायकर यांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

मला बोलता येतं...; लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 2:35 PM

शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात वायकर यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. मला लोकसभेची उमेदवारी मिळाली याचा आनंद आहे. मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.

रवींद्र वायकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून जे काम केले आहे, त्याबद्दल मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मी मागच्या बेंचवर बसणारा नाही तर सर्वात पुढे होऊन प्रश्न मांडणारा आहे. मी लोकसभेत देशाचे प्रश्न तर मांडणार तर आहेच पण माझ्या मुंबईचे सर्वाधिक प्रश्न मांडणार आहे. मला बोलता येते. मला प्रश्नांची जाणीव आहे. एकादा प्रश्न विचारणे आणि त्याचे अचूक उत्तर घेणे हे माझ्या जवळ आहे. त्याप्रमाणेच मी काम करणार आहे, असं रवींद्र वायकर म्हणाले.

“वायकर हा ब्रँड झालाय”

मी जी कामं केली आहेत. त्यामुळे वायकर हा एक ब्रँड झाला आहे. केवळ ती कामे पाहूनच मला उमेदवारी मिळाली आहे. मी कधीच जाती आणि धर्माचा विचार केला नाही. मी काम करणारा आहे. निवडणुकीत उभा राहताना आपल्या समोर समोरच्याचे आव्हान असतेच. पण मी प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. या निवडणुकीत मी कुणालाही वाईट म्हणणार नाही. तर मी काय करू शकतो त्यावर मतं मागणार आहे. मी जिंकूनच येणार आहे, असा दावाही वायकर यांनी केला.

“मला क्लिनचीट मिळालीय”

राजकारणात अनेक आरोप होतात, बऱ्याच वेळा मुद्दाम आरोप केले जातात. पण तुम्ही जर चांगले काम केले तर कुठलाही आरोप तुम्हाला शिवू शकत नाही. माझ्यावर जे आरोप केले होते, त्यावर मी सुप्रीम कोर्टात गेलो होतो. कोर्टाने मला क्लिनचीट दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.