Corona | ‘या’ अटींसह मुंबईतील उपाहारगृह सुरु ठेवण्याची मुभा

उपाहारगृह, कॅफे, ढाबा सुरु ठेवता येणार आहेत. मात्र एका वेळी क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहक बसतील (Mumbai restaurant Rules in Corona Situation)

Corona | 'या' अटींसह मुंबईतील उपाहारगृह सुरु ठेवण्याची मुभा
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 2:08 PM

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने गेल्या काही दिवसांत विविध उपाययोजना केल्या. मात्र गर्दी कमी होत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मुंबईतील अत्यावश्यक सेवा कोणकोणत्या असतील याबाबतची नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत उपाहारगृहे काही अटींवर सुरु ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Mumbai restaurant Rules in Corona Situation)

अटींनुसार उपाहारगृह, कॅफे, ढाबा सुरु ठेवता येणार आहेत. मात्र एका वेळी क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहक बसतील, याची काळजी मालकांना घ्यावी लागणार आहे. दोन ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवून त्यांची आसनव्यवस्था करावी लागणार आहे. तसेच खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्यास किंवा घरपोच देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Corona समूह संसर्ग : कोरोना प्रसाराचा तिसरा टप्पा नेमका काय?

अत्यावश्यक सेवा : पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, बँकिंग सेवा आणि रिझव्‍‌र्ह बँक, विमा कंपन्या, टेलिफोन आणि इंटरनेट सेवा, रेल्वे आणि सार्वजनिक परिवहन सेवा, खाद्यपदार्थ, भाजीपाला, किराणा माल पुरवठादार, रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वीज, इंधन, पेट्रोल पुरवठादार, प्रसारमाध्यमे, बंदरे, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आयटी कंपन्या, परदेशी वकिलात, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मालवाहतूक, पुरवठादार, पेस्ट कंट्रोलची सेवा इत्यादींचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे. (Mumbai restaurant Rules in Corona Situation)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.