“मिंध्यांचं ‘ खोके ‘ सरकार मंत्रिमंडळ येतंय, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘खोकी’ खर्ची पडतील काय?”

Saamana Editorial on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : 'एक फुल, दोन हाफ' सरकार मराठवाड्यात येतंय, या बैठकीतून काही 'खोकी' शेतकऱ्यांसाठी खर्ची पडतील काय? सामनातून सवाल, शेतकरी आत्महत्येवरही भाष्य करण्यात आलं आहे.

मिंध्यांचं ' खोके ' सरकार मंत्रिमंडळ येतंय,  गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'खोकी' खर्ची पडतील काय?
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 8:14 AM

मुंबई | 13 स्पटेंबर 2023 : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते. शिंदे गटातील लोक हे गद्दार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंशी, महाराष्ट्राशी गद्दारी केली, अशी टीका ठाकरे गटाकडून होते. अशातच आता आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे.येत्या शुक्रवारी शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ मराठवाड्यात जाणार आहे. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. मिंध्यांचं ‘ खोके ‘ सरकार मंत्रिमंडळ येतंय, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘खोकी’ खर्ची पडतील काय? ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार मराठवाड्यात येतंय, या बैठकीतून शेतकऱ्यांना काही मिळेल का?, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

गेल्या आठ महिन्यांमध्ये मराठवाडय़ात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खालीघालायला लावणारे आहे. दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाडय़ावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे . कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाडय़ातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिंध्यांचे ‘ खोके ‘ सरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडय़ात येत आहे . जीवन संपवायला निघालेल्या मराठवाडय़ातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही ‘खोकी’ खर्ची पडतील काय?

राज्यातील ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात मुक्कामाला येत आहे. मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाडय़ात घ्यायची, हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ही बैठक आहे, असे दिसते. अवघे मंत्रिमंडळ शहरात येणार म्हणून सर्वत्र रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. त्यातच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचा समारोप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील 75 मिनिटांच्या दौऱ्यावर येणार असल्याने शहरात रंगसफेदीचे काम जोरात हाती घेण्यात आले आहे.

दुष्काळाच्या संकटात काळवंडलेल्या मराठवाडय़ाला व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना या वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार आहे? ऐन पावसाळय़ात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असहय़ बोजामुळे मराठवाडय़ात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

रविवारी तर छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे झाले एका दिवसाचे. पण गेल्या आठ महिन्यांत मराठवाडय़ात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 475 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत, तर 200 हून अधिक शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.