मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ अन् मिलिंद देवरांना नवे व्हिजन मिळाले!; संजय राऊतांचा थेट निशाणा

Saamana Editorial on Milind Deora Inter in Shivsena : मिलिंद देवरांना खास जनाधार नाही, फार तर त्यांना दिल्लीत 'हे' म्हणून काम मिळेल!; संजय राऊतांचा घणाघात. मिलिंद देवरा यांच्या पक्षांतरावर संजय राऊतांचं स्पष्ट भाष्य... मिंधे गटास दिल्लीत एक 'पटेल' अन्... राऊतांचा थेट घणाघात

मिंधे गटास दिल्लीत एक 'पटेल' अन् मिलिंद देवरांना नवे व्हिजन मिळाले!; संजय राऊतांचा थेट निशाणा
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 8:44 AM

मुंबई | 16 जानेवारी 2024 : मिलिंद देवरा यांनी 14 जानेवारीला काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याच दिवशी दुपारी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दक्षिण मुंबई मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना निवडणूक लढायची आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला. देवरा यांच्या पक्षांतरावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. ‘देवरा यांचे ‘मिंधे’ व्हिजन!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून मिलिंद देवरा यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंधेगटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर मिंधेगटाचे दिल्लीतील ‘दूत’ म्हणून काम मिळेल. बदल्यात राज्यसभा मिळेल . उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले . मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले व देवरांना नवे व्हिजन मिळाले . यात राष्ट्रकारण व समाजकारण अजिबात नाही . महाराष्ट्राच्या हिताचा तर विषयच नाही . देवरा यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न , पण मिंधे गटाच्या व्हिजनमुळे काँग्रेस सोडली , असे बोलून त्यांनी स्वतःचीच अवहेलना करू नये , इतकेच!

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडले आहे. देवरा कुटुंबाचे काँग्रेसचे 55 वर्षांचे संबंध होते. मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसमधील बडे प्रस्थ होते व गांधी कुटुंबात मुरली देवरा यांचे वजन होते. केंद्रात देवरा कुटुंबाने सर्वोच्च पदे भूषविली ती काँग्रेसमुळेच. पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा आता त्याग केला व महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या ‘मिंधे’ गटात सामील झाले. काँग्रेस हा एक विचार होताच, पण ‘मिंधे’ गट म्हणजे कोणता विचार आहे की ज्यासाठी 50-50 वर्षांचे काँग्रेसशी नाते त्यांना तोडावेसे वाटले?

राहुल गांधी यांच्या अंतस्थ गोटात मिलिंद देवरा यांचा समावेश होता. पण गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’स रविवारपासून सुरुवात होत असतानाच देवरा यांनी काँग्रेसला सोडले. हा मुहूर्त भाजपने काढला असावा.

देवरा हे लोकसभेच्या दोन निवडणुका सातत्याने हरले व ज्या दक्षिण मुंबईतून त्यांना तिसऱ्यांदा लढायची इच्छा होती त्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. त्यामुळे सध्याच्या महाआघाडीत या जागेवर काँग्रेसला लढता येणे शक्य नव्हते. देवरा यांनी या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी 50 वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....