नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे काय?; संजय राऊतांचा थेट सवाल

Saamana Editorial on Nitin Gadkari : आता नितीन गडकरींचे काय होणार?; संजय राऊतांचा सवाल... भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील नेत्यांची नावं नाहीत. यावरून संजय राऊतांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. आजच्या सामनातून संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे काय?; संजय राऊतांचा थेट सवाल
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 8:07 AM

मुंबई | 05 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यात महाराष्ट्रातील मतदारसंघातले उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. यावरून विरोधक भाजपला धारेवर धरत आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी या यादीत जाहीर करण्यात आली नाही. यावरून राऊतांनी प्रश्न विचारलेत. गडकरींचे काय होणार? या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादीत आहेत, पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आले.

नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मूळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अधःपतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला. या सगळय़ांचेच पंख कातरले. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे काय?

भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. (कालच त्यांनी देशातील शेतकरी व मजूर दुःखी आहेत असे सांगितले.) कुणाच्या पुढे ‘हांजी हांजी’ करणारे नाहीत. देशात गेल्या दहा वर्षांत जो विकास झाला असे मानायचे, त्या विकासात सर्वाधिक योगदान गडकरी सांभाळत असलेल्या रस्ते निर्माण मंत्रालयाचे आहे.

गडकरींनी निर्माण केलेल्या अनेक राष्ट्रीय प्रकल्पांची उद्घाटने पंतप्रधान मोदी यांनी केली, पण त्या कार्याचे श्रेय त्यांनी गडकरींना दिले नाही. मंत्रिमंडळात व भाजपमध्ये मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी.

गडकरी यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे स्वाभिमान, अभिमानाचा ताठ कणा या मराठी नेत्याला लाभला आहे. अशा गडकरींचे आव्हान म्हणा की भीती, ही मोदी-शहांच्या व्यापार मंडळास वाटणारच. त्याच भीतीमुळे 2024 च्या निवडणुकीतून नितीन गडकरींना डावलायचे असे ठरवलेले दिसते. गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही याचे दुःख पक्षातील त्यांच्या चाहत्यांना नक्कीच झाले असेल. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांनी 195 नावे जाहीर केली. त्यात गडकरींचा समावेश नाही.

गडकरींचे नाव पहिल्या यादीत का नाही? हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे; पण 195 नावे जाहीर करताना तावडे यांच्या मनासही ती खंत जाणवली असेलच. ज्या विनोद तावडेंना 2019 साली मोदी-शहांनी उमेदवारी नाकारली, त्याच तावडे यांनी ‘गडकरी’ वजा 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. 2024 साली पक्षात कोणाचेही आव्हान असू नये व गडकरी हे आव्हान ठरू शकतात.

मोदी यांनी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला. हे खरे नाही, ही सर्व हवाबाजी आहे. भाजपचा खेळ 230-235 वर आटोपला तर भाजपमध्येच बंड होईल आणि भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर नितीन गडकरी यांच्या नावास सर्वमान्यता मिळेल, या एकाच भीतीने गडकरी यांचा पत्ता आताच कट करण्याचा डाव दिसतो आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.