सरकारी रूग्णालयात मृत्यूतांडव अन् मुख्यमंत्री दिल्लीत, हे म्हणजे…; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

राज्यातील सरकारी रूग्णालयात मृत्यूतांडव सुरु असताना मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचा दिल्लीत जाणं म्हणजे..., संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचा दिल्लीत, अजित पवार नाराज?; संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

सरकारी रूग्णालयात मृत्यूतांडव अन् मुख्यमंत्री दिल्लीत, हे म्हणजे...; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 12:15 PM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या तिघांमध्ये मध्यरात्रीपर्यंत खलबतचालली. राज्यातील राजकीय विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीसंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. अजित पवार यांच्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केलंय.

महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे. असं असताना राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना त्यांची चिंता नाही. हे राजकारणात अडकलेले आहेत. कोणाला पालकमंत्री कोणाला खाते बदलून अशातच ते अडकले आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी लोकांचा आक्रोश पाहा… याकडं सरकारचं लक्ष नाही. ह्यांचा काय सत्कार करायचा का?, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र हे आजारी राज्य होत चाललं आहे. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र आजाही झाला आहे. या लोकांनी महाराष्ट्राला आजारी राज्य बनवलं हे बरोबर नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत काही पत्रकारांवर कारवाई झाली. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. आठ-नऊ पत्रकारांवर कारवाई केली गेली आहे. चीनकडून फंडिंग मिळतो, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. हे हास्यास्पद आहे. बेडरपणे हे पत्रकार सरकारला प्रश्न विचारण्याचं काम करतात. चीन हस्तक्षेप करत आहे, त्याबाबत तुम्हाला राग येत नाही. पत्रकांवर धाडी घालत आहात. हे ते चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

आणीबाणीचा तुम्ही प्रत्येक वर्षी श्राद्ध घालता. आणीबाणीच्या काळात देखील असं झालं नव्हतं. ईडीच्या धाडी संजय सिंग यांच्यावर देखील घातल्या गेल्या. आम्ही देखील त्यांच्यातून होरपळून बाहेर पडलो आहे. यंत्रणाच फास आवळत आहे. अटक करताना कुठलंही कारण दिलं जात नाही. ईडीचे लोक अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात घुसतात आणि अटक करतात. पण येत्या 2024 च्या निवडणुकीत याचा हिशोब होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.