मुंब्र्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केलं पाप केलं, या सगळ्याचा हिशोब होईल; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut on CM Eknath Shinde : हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदेगटावर निशाणा साधला आहे. वाचा...
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 08 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंब्र्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केलं पाप केलं, या सगळ्याचा हिशोब होईल, इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे मुंब्र्यातील शाखेला भेट देणार असल्याचं म्हटलं आहे. मुंब्र्यातील ठाकरे गट शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
संजय राऊत यांचं ट्विट जसंच्या तसं
हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे.शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे.त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे.मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा हिशोब होईल.हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे.11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत..तुमच्या बुलडोझर पेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्वाचे..हिशोब होईल! 11 नोव्हेंबर मुंब्रा शाखा.. जय महाराष्ट्र
हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे.शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे.त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा… pic.twitter.com/HvFlFzc7aD
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 8, 2023
“यांना लाज वाटत नाही का?”
आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुंब्रा भागात शिवसेना शाखा तोडली आहे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचं स्ट्रक्चर उभं आहे. बेकायदेशीर सरकार चालवत आहे त्याच्यावरती बुडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शाखेवरती बुलडोजर फिरवतात त्यांना लाज वाटत नाही का?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
राऊतांचं शिंदेंना आव्हान
बाळासाहेबांच्या शाखा आजही निष्ठावंत शिवसैनिक त्या ठिकाणी बसत आहे. मुख्यमंत्री जम्मू-काश्मीर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण करत आहे आणि तुमच्या मुंब्रा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळे बाळासाहेबांचे पुतळे, फोटो असलेल्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहे .महाराष्ट्रात ही मोगलाई सुरू आहे का? शाखा तोडत आहेत तुमच्यात हिम्मत असेल तर समोर या…, असं आव्हान संजय राऊत यांनी शिंदे यांना दिलं आहे.