संजय राऊतांचं खळबळजनक विधान; म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना अटक…
Sanjay Raut on Devendra Fadnavis and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर.....
देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार का? या प्रश्नावर आमच सरकार येवू द्या मग बघा… असं म्हणत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी एक खोटं बोलणारी पिढी निर्माण केली. आदित्य ठाकरे यांनी पैसे सापडले. जो आरोप केला आहे तो खरा आहे. एकनाथ शिंदे यांना धमकावलं आणि ते #@xला पाय लावून पळून गेले, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार घणाघात केला आहे.
नरेंद्र मोदींवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी रंग बदलले म्हणता तुम्ही काय बदललं काय @x# बदलली का? यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बेडरपणा हा गुण घेतला नाही. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत. नरेंद्र मोदी हे अपघाताने पंतप्रधान झाले आहेत. 4 जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील, असं संजय राऊत म्हणाले.
ज्या राहुल गांधीशी तुम्ही तुलना होवू शकत नाही, म्हणत होतात. त्याच राहुल गांधीशी तुम्ही तुलना करताय? नरेंद्र मोदी मुंबईत ते सात सभा घेतायेत. महाराष्ट्रात एक दिवसाआड येत आहेत. कारण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचा धसका आहे. हे व्यापारी लोक आहेत यांना फक्त प्रॉफिट आणि लॉस कळतो, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?
सध्या देशभरात लोकसभा निवडणुका होत आहेत. अशात राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. राज्यात 48 जागांसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशात कुणाला किती जागा मिळणार? याची चर्चा होतेय. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील, असा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.