Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी मिळणार?; संजय राऊत यांनी उघडपणे सांगितलं

Sanjay Raut on Shahu Maharaj Chhatrapati Kolhapur Loksabha Election 2024 : कोल्हापुरात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार?; संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं... वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का? संजय राऊतांचं स्पष्ट भाष्य, पाहा काय म्हणाले....

कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी मिळणार?; संजय राऊत यांनी उघडपणे सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 11:59 AM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 02 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात कोल्हापुरातील जागा महाविकास आघाडीकडून कोण लढवणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शाहू महाराज हे या जागेवरून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशीही चर्चा होतेय. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला शाहू महाराज यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना विचारावा लागेल. विनंती करावी लागेल की, ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यत आहे का?, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले…

कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागावरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे. शाहू महाराज यांचा विषय आम्ही राज्यसभेसाठी घेतला होता. शाहू महाराज यांची लोकसभेची जागेसाठी लढण्याची चर्चा अद्याप आमच्यासोबत झाली नाही. काँग्रेसने काय सांगितले आहे मला माहित नाही, असं संजय राऊत म्हणाले.

“मी स्वत: त्यांच्याशी चर्चा करेन”

छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो. त्यांचा प्रचंड मान आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की, शिवसेनेच्या उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडी मध्ये यावं. आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये. 30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना जागा लढवीत आहे. शाहू महाराज यांच्याशी मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी या विषयावर चर्चा करेन. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंद आहे महाराष्ट्र उजळून निघेल, असं संजय राऊत म्हणाले.

वंचित मविआत येणार?

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार असल्याची चर्चा आहे. तशी चर्चा सध्या या चार पक्षांमध्ये सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीमध्ये चर्चा होते. नेत्यांचा यांचाही आग्रह असतो. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. कोणती मागणी केली असेल तर नक्की चर्चा होते. आता प्रकाश आंबेडकर यांची यादी आली आहे. त्यांची देखील इच्छा आहे. यावर लवकरच चर्चा होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...