पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला अन् एकनाथ शिंदे-राहुल नार्वेकरांना आव्हान; संजय राऊतांची सनसनाटी पत्रकार परिषद

Sanjay Raut on PM Narendra Modi CM Eknath Shinde and Rahul Narwekar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सनसनाटी पत्रकार परिषद... संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा, तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आव्हान, वाचा...

पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला अन् एकनाथ शिंदे-राहुल नार्वेकरांना आव्हान; संजय राऊतांची सनसनाटी पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 11:39 AM

मुंबई | 16 जानेवारी 2024 : आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेआधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली नाही, असं संजय राऊत म्हणालेत. तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत. अशी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

“आहे का हिंमत?”

हिंमत असेल तर स्वत: चा पक्ष काढा आणि चालवा. दिल्लीच्या मदतीने पक्ष चोरायचे. राजकारणात पाकिटमारी करायची. हे कसलं राजकारण? ही तर नामर्दानगी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आलेले आमदार पैशाच्या जोरावर पळवायचे. कोर्टबाजी करायची पक्षावर दावा सांगायचा. हे तुमचं तुम्हाला लखलाभ. पण आम्ही या विरोधात लढत राहू, असं संजय राऊत म्हणाले.

शिंदे- नार्वेकरांना आव्हान

शिवसेना पक्षावर दरोडा कसा टाकण्यात आला. या मागचं सत्य काय? विषयावर उद्धव ठाकरे आज महा पत्रकार परिषद घेणार आहेत. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे. अशी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवावी, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

“आज पोलखोल होणार”

नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत. पण आज आम्ही जनतेच्या समोर पत्रकार परिषद घेतो आहोत. आज दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे आणि काही कायदेतज्ज्ञ मिळून विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची पोलखोल करतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.