जी जागा प्रकाश आंबेडकर यांना मिळणार त्या ठिकाणी…; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut on Prakash Ambedkar Vanchit Aghadi Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकर हे लढाऊ नेते आहेत, मात्र...; संजय राऊत नेमकं काय म्हणाले? संजय राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे. वाचा सविस्तर
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 09 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. अशात वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा होत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होत आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. प्रकाश आंबेडकर हे लढाऊ नेते आहेत. त्यांच्या आम्ही भावना समजू शकतो. आपल्या पक्षाकडे जास्त जागे संदर्भात कार्यकर्त्यांचा दबाव असतो. मात्र आम्ही त्यांचं समाधान करू. जे सीट वंचित बहुजन आघाडी सदस्य मिळणार आहेत. त्या सर्व जागा आम्ही जिंकून आणू, असं संजय राऊत म्हणाले.
जागावाटपावरून टोला
ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली असे म्हणत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत जाऊन दोन-चार लोकसभेच्या जागांसाठी व्यापारांची भांडी घासावी लागत आहेत. ड्युप्लिकेट शिवसेनेचा नशीब हेच आहे. शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही 23 जागा सतत लढत होतो. 23 जागा लढू पण जे डुप्लिकेट आहेत, त्यांच्या वाटेला पाच जागा येत नाहीत. पाच जागेचे तुकडे कुत्र्यांपुढे हाडुक फेकावा अशी फेकलेल्या ची बातमी मी वाचत आहे. अजित पवार यांना दोन चार जागेवरतीच बोळवण करत आहेत. ड्युप्लिकेट शिवसेना, ड्युप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नयेत. त्यांचा अंत जवळ आला आहे, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टोला लगावला आहे.
रोहित पवारांच्या चौकशीवर भाष्य
रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे. असा काय गुन्हा केला आहे रोहित पवार यांनी?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. पण माझा इशारा आहे. आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची महाराष्ट्र तोडण्याची जी इच्छा आहे. मुंबई गिळण्याची मराठी माणसाला अपमानित करण्याची महाराष्ट्राला कमजोर करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, असंही ते म्हणाले.
न झुकण्याची आमची भूमिका- राऊत
उद्योग आहे व्यवहार आहे. लहान सहान गोष्टी मागेपुढे झाल्या असतील. त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे आणि बदनाम करणं. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. रोहित पवार यांनी भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगल शाहीपुढे न जुकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि आम्ही घेतली आहे, असं संजय राऊत म्हणाले.