राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे खोटारडेपणाचा कळस; संजय राऊतांचा पुन्हा निशाणा
Sanjay Raut on Rahul Narvekar Judgment about Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरून संजय राऊत यांचा पुन्हा राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे येत्या 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
मुंबई | 14 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागला. यात शिंदे गट म्हणजे खरा शिवसेना हा पक्ष असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. तर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार नार्वेकर यांनी पात्र ठरवले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निर्णयाचा निषेध केसा. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. येत्या 16 जानेवारीला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या निकालाची चिरफाड करणार आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
“ठाकरे 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार”
उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण मतदारसंघांमध्ये भेट दिली. त्या ठिकाणी आपोआप हजारो लोक जमा झाले आणि सभा झाली.कल्याण लोकसभा ही मूळ शिवसेनेकडे परत येईल. शिवसेनेचा कल्याण लोकसभेसाठी आमची तयारी झालेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे. त्यावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया आहे. लोकांच्या मनात द्वेष भावना आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
नार्वेकरांवर निशाणा
विधानसभा अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्ती निपक्ष असते परंतु या ठिकाणी राहुल नार्वेकारांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेला आहे. या सगळ्यांचा चिरफाड करणारी महापत्रकार परिषद 16 तारखेला उद्धव ठाकरे घेणार आहेत. सायंकाळी चार वाजता उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. वरळी येथे डोम सभागृह या ठिकाणीही त्याच्या पत्रकार परिषद होणार आहे. आम्ही या ठिकाणी जनतेला बोलावलेलं आहे. देशाच्या इतिहासातले खुली पत्रकार परिषद या ठिकाणी होणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
देवरांच्या पक्षांतरावर काय म्हणाले राऊत?
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आज ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा जात आहेत. त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. हा महाराष्ट्र आहे. इथे जर कुणी निवडणूक लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतो. तो त्यांचा निर्णय आहे, असं संजय राऊत म्हणालेत.