Sanjay Raut : राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करतायेत, चोरांना सुरक्षा देतायेत; संजय राऊत यांचा थेट निशाणा

Sanjay Raut on Rahul Narvekar and Shivsena MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांचा टाईमपास सुरु आहे. ते चोरांना सुरक्षा देत आहेत. या चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत, असा घणाघाती शाब्दिक हल्ला संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. काय म्हणालेत संजय राऊत? वाचा सविस्तर...

Sanjay Raut : राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करतायेत, चोरांना सुरक्षा देतायेत; संजय राऊत यांचा थेट निशाणा
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 10:59 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही राहुल नार्वेकर या आमदार अपात्रता प्रकरणी टाईमपास करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर थेट निशाणा साधला आहे.

विधिमंडळाचं सार्वभौमत्व राहुल नार्वेकर सांगत आहेत. चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून संरक्षण दिलं जातंय. चोरांना ,दरोडेखोरांना सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील. तर त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात नोंदवलं जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालय निर्देश दिले आहेत. नार्वेकर मात्र टाईमपास टाईमपास सिरिअल बनवत आहेत. हे लोक लंफगे आहेत. हे लोकं चोरी करुन दुसऱ्याच्या घरात घुसले आहेत. विधानसभा अध्यक्ष मात्र या चोरांना संरक्षण देत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदावर असताना देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिला जाईल. उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. त्यांना सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं. पण फासावर लटकवण्यासाठी जल्हादाची गरज असते. ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे. या चाळीस आणि इतर आमदारांना घटनात्मक फासावर लटकवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मिस्टर नार्वेकर, असं म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल नार्वेकर चोरांचे सरदार हे म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. जसे चौकीदार चोर आहेत तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत, असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. आधीच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केला आहे की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवलं पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.