काल ‘महा पत्रकार परिषदे’तून खुलासे; आज संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर पुन्हा हल्लाबोल

Sanjay Raut on Rahul Narvekar : काल ‘जनता न्यायालय’तून घणाघात, आज पुन्हा शाब्दिक हल्ला; संजय राऊत नेमकं काय म्हणाले? काल पुरावे लोकांसमोर मांडल्यानंतर आजही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा...

काल 'महा पत्रकार परिषदे'तून खुलासे; आज संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर पुन्हा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 11:11 AM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला. त्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. काल मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरे गटाने महा पत्रकरा परिषद घेतली. यात विविध खुलासे करण्यात आले. त्यानंतर आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय सर्वांनी पाहिला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

सर्टिफिकेट अन् पक्षाची घटना

दरवर्षी अॅनिव्हरसरीला आपण लग्नाचं सर्टिफिकेट दाखवत नाही. हे आमचं लग्नाचं सर्टिफिकेट आणि आम्ही अॅनिव्हरसरी करतोय, असं कुणी करत नाही. तीस वर्षे 35 वर्षे लोक अॅनिव्हरसरी साजरी करत असतात. पक्षाची घटना एकदा निवडणूक आयोगाला दिली. की ती दिलेली असते. त्या घटनेत जे बदल होतात. ते आपण वेळोवेळी कळवत असतो. ते शिवसेनेने केलेलं आहे. त्याचे पुरावे काल आम्ही सादर केले आहेत. हे नार्वेकरांनी काल पाहिलं असेल. तर त्यांना लक्षात यायला पाहिजे. ते वकी आहेत. नाही तर तुमची डिग्री तपासा, असं म्हणायची वेळ आमच्यावर येऊ नये. साध्या वकिलाला जे कळतं. ते तुम्हाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

नार्वेकरांवर हल्लाबोल

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचे आयोजन केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लवाद ट्रॅव्हूनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत याची प्रत्यक्ष पुरावे हे काल समोर आणले. राहुल नार्वेकरांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली. ती हास्यास्पद होती. त्यांचं तेच परत तुणतुणं होतं, असं संजय राऊत म्हणाले.

नार्वेकर म्हणाले, हे का नाही दिलं आणि ते का नाही दिलं आम्ही काल सर्व स्क्रीनवर दाखवलं. काल सर्व दाखवलं. सर्वोच्च न्यायालयातील इलेक्शन कमिशनर समोर आहे. 1999 ची घटना इलेक्शन कमिशनला आहे. त्यांना मला सांगायचं आहे आपण वकील आहात आणि देवेंद्र फडणवीस देखील वकील आहेत. दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावं, असं संजय राऊत म्हणाले.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.