अपात्रतेबाबत आधीच ‘मॅच फिक्सिंग’ झालंय, आज फक्त…; संजय राऊतांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा

Sanjay Raut on Shivsena MLA Disqualification Case Final Hearing Result Today and Rahul Narvekar : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे वारंवार भाजप आणि शिंदेगटावर टीका करत असतात. पण संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलतावा आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. वाचा...

अपात्रतेबाबत आधीच 'मॅच फिक्सिंग' झालंय, आज फक्त...; संजय राऊतांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 11:50 AM

मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज या प्रकरणी निकालाचं वाचन करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असं दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“आजचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग”

जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय त्याच्यावर चर्चा होतेय. दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. जे निर्णय घेतले जात आहेत. त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा विधानसभेचे यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली. त्यांनी दराने कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत तटस्थ तर राहिले पाहिजेत, असं संजय राऊत म्हणालेत.

“आजचा निकाल दिल्लीतून आलेला”

आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिल्लीतूनच आलेला आहे. आता फक्त शिक्का मारणं बाकी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जाणार आहेत. कोणत्या खात्रीवर त्यांनी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तुमची मॅच फिक्सिंग झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोडशोसाठी दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. कारण त्यांना निर्णय माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकादेशीर आहे. मूळ व्हीप सुनील प्रभू आहेत. शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे मुख्यमंत्री म्हणून त्या सरकारमध्ये वसलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण दिलेलं आहे. राज्यपालांची प्रत्येक कृती आणि कारवाई बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने महाराष्ट्रात राज्य करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.