वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता मावळली; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut on Vanchit Prakash Ambedkar And Mahavikas Aghadi Alliance Lokasabha Lection 2024 : वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता मावळली; संजय राऊत नेमकं काय म्हणाले? प्रकाश आंबेडकरांसोबतच्या चर्चेवर सविस्तर प्रतिक्रिया, जागावाटपावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली? वाचा सविस्तर..
दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली. यात स्थानिक पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सामील होऊ शकते अशी चर्चा होती. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची तशी चर्चा देखील सुरु होती. मात्र आता वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता मावळली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.
वंचितबाबतच्या युतीवर राऊत काय म्हणाले?
बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहे. त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली. त्यांनी चार जागेवरती लढावं, त्यांना आम्ही सूचना केले आहेत. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असं संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा होईल”
देशात सध्या सुरू असलेल्या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
जागावाटपावर राऊतांची प्रतिक्रिया
काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्र मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन एकत्र येऊन इंडिया आघाडी आहे. आम्ही त्या राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड झारखंड इथं जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील सीट मागता आहे. त्याचे संघर्ष त्यावर अवलंबून असते . त्यांच्या अस्तित्व कार्यकर्ते त्यावर अवलंबून असतं, असं संजय राऊत म्हणाले.