शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी…; शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat on Sanjay Raut and Sharad Pawar : संजय राऊतांवर बोलणं घाणीत दगड मारल्यासारखं...; शिंदे गटाच्या नेत्यांचं वक्तव्य... शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर शिंदे गटातील नेत्यांने टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाता सविस्तर...

शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊतांनी...; शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
sanjay rautImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 3:18 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरादार टीका करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. संजय राऊत हे शरद पवारांचा अजेंडा राबवत आहेत. सांगलीच्या जागेवरून मुद्दाम त्यांनी मुद्दाम ख्वाडा घातलाय. हे ते शरद पवारांच्या सांगण्यावरून करतायेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये. पन्नास खोके आम्हाला काय सांगतो. आम्ही जेव्हा विवस्त्र होऊ तेव्हा तू ये आणि दर्शन घे… संजय राऊतांवर बोलणं घाणीत दगड मारल्यासारखं आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

महायुतीचं जागावाटप कधी?

महायुतीची काल रात्री बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. काही मतदार संघाच्या ज्या अडचणी होत्या. ते तिन्ही नेत्यांनी समजून घेतल्या आणि उचित तोडगा सुद्धा निघालाय. आज मी मुख्यमंत्र्यांकडे माहिती घ्यायला जातोय. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही नावांची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1-2 जागांवर नाराजी होती. तिन्ही नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आग्रह असणं गैर नाही. पण समजूत घालणं, संवाद साधणं गरजेचं असतं. ते या तिन्ही नेत्यांनी केलंय. एखाद्या मतदारसंघात अशी घटना होत असते, असं संजय शिरसाट म्हणाले.

नाशिकच्या जागेवरून वाद; शिरसाट म्हणाले…

भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. त्यावर त्यांचं जे काही मत असेल ते त्यांनी शिंदे साहेबांकडे मांडावं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही, शिरसाट म्हणाले. नाशिकच्या जागेबद्दल वाद असायला नको. गोडसे 2 वेळा खासदार राहिले आहे. त्यांची लीड वाढत गेलीय. आता कोणत्याही जागेवर तिढा असा राहिलेला नाही. भाजप आणि आमच्यात असा कोणता चिंतेचा विषय नाहीये. तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवतील. आज शिवसेनेची यादी जाहीर होणार आहे, जास्तीत जास्त मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील, असंही ते म्हणाले.

बऱ्याचश्या ठिकाणाहून जे सर्वे आले ते निगेटिव्ह दाखवण्यात आले. पण तिथले सगळे कार्यकर्ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत . भेट घेऊन तिथे सांगत आहेत की आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे अशा सर्वांना फार काही जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. येत्या काळात महायुतीच जिंकणार, असं शिरसाट म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.