Sanjay Raut : संजय राऊत ही राज्याला लागलेली किड; शिंदे गटातील आमदाराने थेट निशाणा साधला

Shivsena Eknath Shinde Group MLA on Sanjay Raut : शिंदे गटातील आमदाराने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. थेट निशाणा; शिव्यांची लाखोली वाहिली... संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलंय. वाचा...

Sanjay Raut : संजय राऊत ही राज्याला लागलेली किड; शिंदे गटातील आमदाराने थेट निशाणा साधला
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 1:13 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी मुंबई | 07 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिव्यांची लाखोली यावेळी वाहण्यात आली आहे. संजय राऊत यांनी घणाघात नाही तर घाण टीका केली आहे. खाली वाकून पाहण्याची त्याची सवय आहे. तुम्ही चोर आहात पण तुमच्यावर कारवाई होणार म्हणून टीका करता. संजय राऊत हरा#*# माणूस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जात टीका करणारे याआधी आम्ही पाहिले नाहीत. नशिब फक्त नाडी आणि बेल्ट राहीला. त्याखाली काय आहे ते पाहीले नाही, नाहीतर नॅशनल टीव्हीवर तेही सांगतील, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

राज्यसरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीच्या हाती आहे, असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या विधानावरून संजय शिरसाठ यांचा पारा चढला. शिरसाट यांनी संजय राऊत यांना शिवीगाळ केली आहे. संजय राऊत ही राज्याला लागलेली किड, संजय राऊत हा भड#X@ माणूस आहे. जर तो आमच्या साहेबांना अशा भाषेत बोलत असेल तर त्याचा आम्हीही ऊद्धार केल्याशिवाय राहणार नाही, सडेतोड उत्तर मिळेल, असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस मदारी झाले आहेत. हे दोघे माकडं आहेत. फडणवीस डमरू वाजवत आहेत. डम डम डम डम… हे दोघे नाचत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी आज बोलताना केला त्याला संजय शिरसाटांनी उत्तर दिलं.  देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तर मग तुम्ही काय करता? संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता… न घर का ना घाट का… शिंदे फकीर , त्यांना लालच नाही. राज्यसभा उमेदवारी मागताना त्यांनी शिंदेंना मला वाचवा असं म्हणाला होता आणि आता असंच भड#!@ करत राहा, असं म्हणत शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

आरोग्य व्यवस्थेबाबत चौकशी व्हायलाच हवी. पण त्याला राजकीय रंग कशाला देताय. इडी तुमचे सगळे खोके बाहेर काढणार आहे. तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या पाया पडला. शिवसेनेचा कार्यक्रम होतो तेव्हा आम्ही सगळ्यांचे फोटो लावतो, आम्ही तुमच्यासारखे दलाल नाहीत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....