त्यांनी कुठे जावं हे…; विजय शिवतारेंच्या राजकीय भूमिकेवर शिंदे गटातील नेत्याची स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया
Sanjay Shirsat on Vijay Shivtare and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशातच विजय शिवतारेंनी घेतलेल्या भूमिकेवर महायुतीतूनच विरोध केला जात आहे. शिंदे गटातील नेत्यानेच यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर...
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असताना बारामती लोकसभा मतदारसंघात वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. वारंवार तसा निर्धार शिवतारे व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर महायुतीतूनच आक्षेप घेण्यात येत आहे. यावर शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय शिवतारे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
विजय शिवतारे यांनी कुठं जावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्या आघाडीला आम्ही महायुती म्हणतो तर युतीच्या कुठल्याही नेत्यांकडे पक्षाकडे गेले तर बंडखोरी करणं गरजेचं नाही आणि करू सुद्धा नये. महायुतीत एखाद्या पक्षाला जागा दिली तर तिथे बंडखोरी नको, ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं.
दोन वेळा विजय शिवतारे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना समजून सांगितलं. मात्र त्यांना हा निर्णय घ्यायचा आहे तर पक्षाचा आणि त्यांचा संबंध राहणार नाही. आणखीही वेळ गेली नाही. आज उद्यामध्ये चर्चा होऊन त्यांनी ऐकलं तर ते युतीसाठी चांगलं राहील. कारण अखेरचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांना द्यायचं. शिवतारे निवडणूक लढवायचं असेल असं ठाम असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर नाही, असं शिरसाट म्हणाले.
आढळराव अजित पवार गटात जाणार, शिरसाट म्हणाले…
शिवाजीराव आढळराव पाटील हे पक्षात नाराज नाहीत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली की त्यांना निवडणूक लढवायची आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ही शब्द दिला होता की, तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर ती लढवला येईल. मात्र युती धर्म पाळण्यामध्ये काही जागा सुटतील. त्यात शिरूर ची जागा राष्ट्रवादीकडे जात असेल. तर तर त्या ठिकाणी प्रबळ असा उमेदवार पाहिजे असेल तर आढळराव त्यांच्यासोबत जात असतील, असं शिरसाट म्हणाले.
पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या तिकीटवर लढला होता. त्याच पद्धतीने आढळराव राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. युतीधर्म असला तर कार्यकर्ता बाजूला सरला गेला नाही पाहिजे. आढळराव आणि केलेली ही अॅडजेस्टमेंट असेल, असं शिरसाटांनी म्हटलं.