मुंबईत तरुणीची गँगरेप करुन हत्या, दोन शेजाऱ्यांना अटक

राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये अचानकपणे वाढ झाली आहे. मुंबईतही सांताक्रुझ परिसरात एका तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला

मुंबईत तरुणीची गँगरेप करुन हत्या, दोन शेजाऱ्यांना अटक
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 1:03 PM

मुंबई : राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये अचानकपणे वाढ झाली आहे. मुंबईतही सांताक्रुझ परिसरात एका तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला (Santacruz Gangrape and Murder). या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी तरुणीचे जवळचे मित्र असल्याची माहिती आहे. सांताक्रुझ परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनामुळे सांताक्रुझ परिसरात एकच खळबळ उडाली (Santacruz Gangrape and Murder).

मृत तरुणी ही सांताक्रुझमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहायची. तिच्या घराशेजारी एका खोलीत तीन तरुण राहायचे. यापैकी दोघांनी पीडित तरुणीला त्यांच्या खोलीत बोलावलं. तरुणी या तरुणांना ओळखत असल्याने ती त्यांच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यानंतर या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला, तिला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता यांनी उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर या दोन्ही नराधमांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, खोलीत राहणारा तिसरा तरुण रात्री घरी आला. दार उघडताच त्याला तरुणीचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ चाळीतील इतर रहिवासी आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहिती आणि काही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या दोन्ही नराधमांना अटक केली. या दोघांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.