मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतही शाळा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे. मात्र, मुंबईतील शाळाही आता लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. (Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग
Varsha Gaikwad
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 12:44 PM

मुंबई: राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतही शाळा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे. मात्र, मुंबईतील शाळाही आता लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात चर्चा झाली असून शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युलाही ठरला आहे. खुद्द वर्षा गायकवाड यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. (Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

वर्षा गायकवाड यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना शाळा सुरू होण्याबाबतची माहिती दिली. मुंबईतील पालिकेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. माझी महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. शाळा सुरू करण्याबाबत ते सकारात्मक आहेत, असं गायकवाड यांनी सांगितलं.

फॉर्म्युला काय?

मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं त्या म्हणाल्या.

सरकारला धोका नाही

विरोधकांकडून पुन्हा सत्तेत येणार असल्याची विधानं केली जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं सरकार बनलं तेव्हा विरोधकांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळण्याची भविष्यवाणी केली होती. पण सरकार अजूनही स्थिर आहे. सरकारला कसलाही धोका नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.

ऑक्टोबरमध्ये निवडणुका

दरम्यान, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही यावेळी मीडियाशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आम्ही दोन पावलं पुढे गेलो आहोत. ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर निवडणूक तयारीला अधिक गती मिळेल, असं भाई जगताप म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं सूचक विधान राहुल गांधी यांनी एक महिन्यापूर्वीच केलं होतं. त्यानुसार आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. सर्वच्या सर्व 227 जागा आम्ही लढणार आहोत, असं जगताप म्हणाले.

जगताप यांनी यावेळी आरोग्य शिबीरांची गरजही व्यक्त केली. मेडिकल कँम्प ही शहरांची मोठी गरज आहे. दीड ते पावणे दोन कोटी लोकसंख्येचं हे शहर आहे. या शहराला पालिका सर्वच सुविधा पुरवू शकत नाही. काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या सुविधा देत आहोत, असं ते म्हणाले.

बंददाराआड चर्चा करूनही आघाडीची कोंडीच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बंददाराआड चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारणा करण्यात आली असता बंददाराआड अनेकदा चर्चा झाल्या. पण केंद्राकडून महाविकास आघाडीची कोंडीच झाली आहे. केंद्राने राज्याचे 93 हजार कोटी रुपये अजूनही दिलेले नाहीत. आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल आम्ही मोदींना केला. पण त्याचंही उत्तर आलं नाही, असं सांगतानाच सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही पाच वर्ष सत्तेत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

संबंधित बातम्या:

Audio Clip : पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप, महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, भाजप कारवाई करणार का?

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; पण घाबरून चालणार नाही: छगन भुजबळ

मोदी माझ्यावर जळतात, रोमला जाण्यास परवानगी नाकारल्याने ममता बॅनर्जी संतापल्या

(Mumbai Schools to reopen soon, says education minister Varsha Gaikwad)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.