स्वतः ला युवराज समजाच पण…; शिंदे गटातील नेत्याची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

Shambhuraj Desai on Aditya Thackeray : ठाण्यातील कोपरा सभेत आदित्य ठाकरेंचं धाडसी विधान...; शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने लक्ष वेधलं. काही नेते आक्रमकतेने बोलतात. काही अती आक्रमकतेने बोलतात. ती त्यांची त्यांची स्टाईल आहे. त्यावर बोलण योग्य नाही, असं म्हणत नितेश राणेंच्या वक्तव्यावर देसाईंनी प्रतिक्रिया दिलीय.

स्वतः ला युवराज समजाच पण...; शिंदे गटातील नेत्याची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
Follow us
| Updated on: Feb 19, 2024 | 3:42 PM

अविनाश माने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : काल ठाकरे गटाचे युवराज आदित्य ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर होते. कोपरा सभेमधून त्यांनी धाडसी विधान केलं. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी तुमच्या विरोधात निवडणूक लढतो… त्यांचं हे विधान आश्चर्यकारक आहे. गर्दी बघून स्फूर्ती आली तर समजू शकतो. ठाण्याच्या मी पालकमंत्री आहे मला पूर्ण कल्पना आहे जिल्ह्याची आहे. काल कोपरा सभा झाली. ३००,२००,४०० आणि ३५०-४०० लोक होते. स्वत:ला युवराज समजाच पण सभांमध्ये ५०० चा आकडा देखील गाठता आला नाही. उसणं अवसान आणून त्यांनी हे विधान केलंय, असं म्हणत शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीवर देसाईंचं भाष्य

२०१९ ला वरळी मधून ते लढले. पण दोन दिग्गच माजी आमदारांना विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली? ज्यांना निवडून यायला दोन विधान परिषदेच्या जागा द्यावा लागतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर भाष्य करू नये. येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल. येणाऱ्या निवडणूक आणखीन बिकट परिस्थिती होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी हे विधान मागे घ्यावं, असं शंभूराज देसाई म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर टीका

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी येऊन बघावे किती आधुनिक शेती केली आहे. त्यांनी कधी शेती कधी केला नाही कधी शेतात काम केलं नाही त्यांना मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दरे गावात जायला दोन रस्ते आहेत. दोन मोठ्या पुलांचे काम सुरू आहे. हे गाव पुनर्वसित गाव आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या टीकेला शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मनसेसोबत युती होणार?

मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. जे हे विचार घेऊन जे येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. मात्र कोणाला घ्यायचं हा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील. त्यांच्या येण्याने कोणाच्याही सीट कमी होणार नाही, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.