नरेंद्र मोदींच्या जेवढ्या सभा होतील, तेवढं आम्हाला बहुमत…; शरद पवारांकडून आभार की टोला?
Sharad Pawar on Narendra Modi : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महत्वाचे मुद्दे मांडलेत. यावेळी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत शरद पवार यांनी एक विधान केलंय. पवारांच्या विधानाने लक्ष वेधलंय. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर......
लोकसभा निवडणूक संपताच आता महाराष्ट्राला वेध लागलेत ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची… या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत एक विधान केलं. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. देशाच्या पंतप्रधानांनी सभा अशा काही घेतल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो, असं शरद पवार म्हणाले.
हा तर सत्तेचा गैरवापर- पवार
महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले. याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे, असं शरद पवार म्हणाले.
सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील. अजितदादांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू… त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. आम्ही का सांगावं, असंही शरद पवार म्हणालेत.
कांदाप्रश्न आणि शेतकरी प्रश्नावर भाष्य
साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. साधी गोष्ट आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.