भाजप रणछोडदास!, 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणणारे स्वत: ला रामापेक्षा मोठं मानतात का?; राऊतांचा हल्लाबोल

Shivsena MP Sanjay Raut on BJP and Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिराचं उद्घाटन आणि भाजपची भूमिका यावर संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच गिरीश महाजन यांच्या टीकेलाही संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

भाजप रणछोडदास!, 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणणारे स्वत: ला रामापेक्षा मोठं मानतात का?; राऊतांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 11:59 AM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 डिसेंबर 2023 : राममंदिराच्या उद्घाटन होणार आहे. इथं उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आलं नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप रणछोडदास असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणाणारे स्वत: ला रामापेक्षा मोठं मानतात का?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

भाजपवर टीका

कोण काय म्हणतंय. कोण काय सांगतंय… ही चटण्या लोणची आहेत. भाजपकडे त्यांच्या लोकांकडे फार लक्ष देणं गरजेचं नाही. कारण इतिहास साक्षीला आहे. इतिहास आणि भाजपचा काहीही संबंध नाही. देशाचा इतिहास घडवण्यामध्ये मग तो देशाचा स्वातंत्र्यलढा असेल. मुंबईचा लढा असेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल. आयोध्या आंदोलन असेल. देशातील कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात ही लोक नव्हती. त्यामुळे यांना दुसऱ्यांविषयी पोटदुखी आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

महाजनांवर निशाणा

भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी राम मंदिराचं उद्धाटनावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. व्हीव्हीआयपी लोकांना या राम मंदिराच्या उद्घटनासाठी बोलावलं आहे. राज ठाकरे व्हीव्हीआयपी आहेत. तर उद्धव ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कोण महाजन? मी फक्त एकाच महाजनांना ओळखतो. ते म्हणजे प्रमोद महाजन. प्रमोद महाजन यांचं शिवसेना भाजप युतीसाठी शेवटपर्यंत योगदान होतं. तेच महाजन मला फक्त माहिती आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हे कधी भगतसिंग, पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाहीत. हे काहीच घडवू शकले नाहीत. मुळात यांचा जो देश आहे हे म्हणतात 2014 नंतर निर्माण झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देखील 2014 नंतरच निर्माण झाला आणि आयोध्या आंदोलन त्याआधीच आहे. हे पळकुटे आहेत, हे रणछोडदास आहेत, इतिहास हा भाजपने पाहिला पाहिजे शिवसेना कुठे होती, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.