मुंबईत आणखी एक ‘कोरोना’बळी, यूएईहून परतलेल्या वृद्धाचा मृत्यू

मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची गुड न्यूज मिळाली असताना कस्तुरबा रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त वृद्धाच्या निधनाचं वृत्त आलं. (Mumbai Corona Patient Death)

मुंबईत आणखी एक 'कोरोना'बळी, यूएईहून परतलेल्या वृद्धाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 12:40 PM

मुंबई : मुंबईत आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यूएईहून अहमदाबादला परतलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. महाराष्ट्रातील चौथ्या बळीची नोंद झालेली आहे. (Mumbai Corona Patient Death)

65 वर्षीय पुरुष रुग्णाला ताप, खोकला आणि श्वसनाचा होत असल्यामुळे 23 मार्चला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आण्यात आले होते. ते यूएईला प्रवास करुन 15 मार्चला अहमदाबादला आले होते, तर 20 मार्चला मुंबईत आले होते.

संबंधित रुग्णाला उच्चरक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. प्रकृती गंभीर झाल्यामुळे उपचारादरम्यान काल (सोमवार 23 मार्च) संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे कोविड19 चाचणीचे निदान पॉझिटिव्ह आले होते.

खरं तर, आज सकाळीच महाराष्ट्राला दुसरं मोठं यश आल्याचं वृत्त आलं होतं. मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 40 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 कल्याण – 5 सांगली – 4 नागपूर – 4 यवतमाळ – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 सातारा – 2 ठाणे -2 पनवेल – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1

एकूण 101

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च (Mumbai Corona Patient Death) मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च

एकूण – 101 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च

एकूण – 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू (Mumbai Corona Patient Death)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.