घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले….

Uday Samant on Ghatkopar Hoarding Accident Loksabha Election 2024 : मंत्री उदय सामंत यांनी घाटकोपरच्या दुर्घटनेवर भाष्य केलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीवरही उदय सामंत बोलते झाले. तसंच विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलंय. उदय सामंत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले....
मंत्री उदय सामंत
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 8:25 PM

मुंबईच्या घाटकोपर भागात काल होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. घाटकोपरच्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 44 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 240 तक्रारी घाटकोपरच्या होर्डिंग विरोधात कऱण्यात आल्या होत्या. 240 तक्रारी घाटकोपरच्या अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई नाही. दोन ते अडीच वर्षापासून या तक्रारी करण्यात आल्या होत्या, असं उदय सामंतांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणावरून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भावेश भिंडेला कोणाचा राजश्रय होता? भावेश भिंडे हा प्यादा आहे. या होर्डिंग दुस-याच्या कुणाच्या तरी असू शकतात. जागतिक पातळीवरील सर्वांत मोठं होर्डिंग आहे असं बोललं जात होतं. भावेश भिंडे उबाठात काम करायला तयार झालेला होत्या. भावेश भिंडेला मोठ करण्यात आलेलं आहे. होर्डिंग कंत्राट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे घडला असावा. होर्डिंग प्रकरण बाजूला पडावं म्हणून मुख्यमंत्र्यांवर भूखंड घोटळ्याचे आरोप लावण्यात आले आहेत. घाटकोपर होर्डिंग कोसळून दुर्घटना प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं उदय सामंत म्हणाले.

मोदीच पंतप्रधान होणार- सामंत

लोकसभा निवडणुकीवर उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. स्वप्न पाहिला काही पैसे लागत नाही. स्वप्न कधीही पूर्ण होवू शकतं नाही. 400 आसपास जागा निवडून येवून नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं उदय सामंत म्हणालेत.

राऊतांच्या पत्रकार परिषदेवर टीका

वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या फोटोखाली काँग्रेसचा हात आहे. होर्डींगच्या बाबतीत राजकारण करण्यात आलं. उबाठाला विलनीकरणाची गरज नाही ती काँग्रेसमध्येच आहे. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॅमेज कंटोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. सकाळची पत्रकार परिषद त्याचाच प्रयत्न होता, असं म्हणत संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर उदय सामंतांनी भाष्य केलं आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.