मुंबई 2050 पर्यंत पाण्याखाली बुडणार?

दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे मुंबई शहर 2050 पर्यंत मोठ्या हाय टाईडमुळे बुडण्याची (mumbai under water 2050) शक्यता आहे.

मुंबई 2050 पर्यंत पाण्याखाली बुडणार?
Follow us
| Updated on: Oct 31, 2019 | 3:49 PM

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे मुंबई शहर 2050 पर्यंत मोठ्या हाय टाईडमुळे बुडण्याची (mumbai under water 2050) शक्यता आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि कोलकातासारखे देशातील मोठी शहरंही पाण्याखाली (mumbai under water 2050) जाणार आहेत, अशी शक्यता न्यूयॉर्कस्थित क्लायमेट सेंट्रल संस्थेने वर्तवली आहे.

क्लायमेट सेंट्रलच्या अहवालानुसार, जर कार्बन डाय ऑक्साईड (CO2) च्या उत्सर्जनात घट झाली नाही, तर 2050 पर्यंत मुंबई पाण्याखाली जाऊ शकते. दिवसेंदिवस समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्याचा फटका या शहरांवर बसू शकतो. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका हा व्हिएतनाम देशाला बसण्याची शक्यता वर्तवली आहे.

विशेष म्हणजे दक्षिण मुंबई सर्वाधिक पाण्याखाली बुडणार आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या लाखो लोकांना याचा फटका बसणार आहे. दक्षिण मुंबईची परिस्थिती 2050 मध्ये कशी असेल याचा एक मॅप न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केला आहे.

मोठ्या हाय टाईडमुळे शहरांना मोठा फटका बसणार आहे. त्यासोबतच यामध्ये एकट्या भारतात 50 लाख ते 3.5 कोटी लोकांना पुराचा फटका बसू शकतो. 2050 पर्यंत अनेकजण अशा ठिकाणी राहत असतील की त्या जागा पुरामध्ये बुडणाऱ्या असतील. हाय टाईडमुळे 15 कोटी लोकांची घर पाण्यात वाहून जाणार आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

मुंबईतील प्रोजेक्टवर संकट

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या अहवालामुळे आता मुंबईतील प्रोजेक्टवर याचे संकट येऊ शकते. मुंबईत सध्या मोठे प्रोजेक्ट होत आहेत. तसेच यामध्ये अंडरग्राऊंट मेट्रो, शिव स्मारक, कोस्टल रोडसारख्या प्रोजेक्टचा समावेश आहे. त्यामुळे या प्रोजेक्टलाही याचा फटका बसेल, असं म्हटलं जात आहे.

प्रत्येकवर्षी मुंबईवरील संकटात वाढ 

गेल्यावर्षीच्या अभ्यासात मुंबईवर एवढे मोठे संकट दाखवले नव्हते. सुरुवातीला शहरातील नदी जवळील विभाग ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर क्षेत्रात पुराचा फटका बसू शकतो, असं दाखवले होते. पण क्लायमेट सेंट्रलद्वारे प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात समजत आहे की, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या 30 वर्षात मुंबईतील काही भाग पाण्याखाली जाईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.