Mumbai University : मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल; शिवीगाळ, बॉम्बस्फोटचा इशारा, नेमकं काय घडलं?

मुंबई विद्यापीठाला मेलवरून धमकी आणि शिवीगाळ करण्यात येत होती. 10,11 आणि 12 तारखेला आले धमकीचे मेल आले आहेत. 10 ते 12 ऑगस्टपर्यंत ईमेलवरुन धमकी देणे आणि शिवीगाळ करणं सुरु होते.

Mumbai University : मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल; शिवीगाळ, बॉम्बस्फोटचा इशारा, नेमकं काय घडलं?
mumbai university
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 11:03 AM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे फेक कॉल येण्याचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई विद्यापीठाला देखील ईमेलद्वारे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. बी.कॉमचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा, यासाठी धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलीय.

10 आणि 11 ऑगस्टला धमकी

मुंबई विद्यापीठानं बी कॉमचे निकाल लवकर लावावेत यासाठी धमकी देण्यात आली आहेत. 10 ते 12 ऑगस्टपर्यंत ईमेलवरुन धमकी देणे आणि शिवीगाळ करणं सुरु होते.

मुंबई विद्यापीठाला मेलवरून धमकी आणि शिवीगाळ करण्यात येत होती. 10,11 आणि 12 तारखेला आले धमकीचे मेल आले आहेत. त्यापैकी 12 ऑगस्टच्या ईमेलमध्ये बीकॉमचे रिजल्ट्स लवकरात लवकर लावा असे, म्हणत मेलवर शिवीगाळ करत बॉम्बचे छायाचित्र पाठवण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाची पोलीस ठाण्यात धाव

मुंबई विद्यापीठ प्रशासनानं सलग तीन दिवस धमकीचे मेल प्राप्त झाल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आलीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोट ठेवल्याचे फेक कॉल करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व शैक्षणिक विभागांतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहेत. याची कालपासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी प्रतिसाद दिला आहे. अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे.

असे आहे ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक

– नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज सादर करणे : 12 ऑगस्टपासून 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत

– ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी : 26 ऑगस्टपासून 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत

– तात्पुरती गुणवत्ता यादी : 30 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता

– विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास सादर करणे : 31 ऑगस्ट

– अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबरला 6 वाजता जाहीर होणार

इतर बातम्या

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; पहिल्यांदाच केंद्रीय पद्धतीने प्रवेश

Mumbai University received threat email from unknown person and gave warning of bomb blast

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.