मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. 10 जागांच्या या निवडणुकीत आतापर्यंत 8 जणांचे निकाल समोर आले आहेत. या आठही जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे गेल्या 2018 च्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला होता. यानंतर यावर्षी या निवडणुकीत कोण बाजी मारतं? याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. शिवसेनेत फूट पडल्याने राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारेल? याकडे राज्याचं लक्ष होतं. विशेष म्हणजे ही निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ही निवडणूक मुंबई विद्यापीठाला घ्यावी लागली. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेचाच बोलबाला बघायला मिळत आहे.
Most Read Stories