रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक लवकरच होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

Mumbai University Senate elections schedule : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाचं संभाव्य वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. मागच्या वर्षभरापासून रखडलेली ही सिनेट निवडणूक आता होणार आहे. ही निवडणूक नेमकी कधी होणार? निवडणूक कार्यक्रम कसा असणार? वाचा सविस्तर...

रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक लवकरच होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 10:26 AM

मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मागच्या वर्षभरापासून रखडली होती. ही निवडणूक आता लवकरच होणार आहे. या सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती आहे. 21 एप्रिलला मतदान होईल. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होण्याची शक्यता आहे. आजपासून नव्या मतदारांची नोंदणी सुरु झाली आहे. 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या महिनाभराच्या काळात नव्या मतदारांची नोंदणी पार पडेल. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

मागच्या महिन्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र काही लोकांच्या हस्तक्षेपांमुळे हा वाद कोर्टात गेला. त्यानंतर सिनेट निवडणुकीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी. त्यासाठी विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर करावं, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने या सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं असेल.

सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक

आजपासून मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचं वार पाहायला मिळेल. 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात मतदारांनी नोंदणी होईल. 1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024 या काळात मतदार अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 26 फेब्रुवारी 2024 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

29 फेब्रुवारी ला या सिनेट निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. 11 मार्च 2024 पर्यंत इच्छुकांना या निवडणुकीसाठी अर्ज करता येईल. 11 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 18 मार्च 2024 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 20 मार्च या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. 21 एप्रिल 2024 या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. 24 एप्रिल 2024 या दिवशी मतमोजणी पार पडेल आणि निकाल सर्वांसमोर असेल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.