कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी मुूंबई | 15 जानेवारी 2024 : आताच्या घडीची मोठी बातमी… उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठं कांड होणार, असा फोन अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र पोलीसांना केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या घराबाहेर मोठं कांड करणार आहेत, असा फोन अज्ञात व्यक्तीचा महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला केला आहे. राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुका निवडणुका तोंडावर आहेत. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर ‘कांड’ होण्याचा फोन येणं अत्यंत गंभीर आहे.
एक व्यक्ती मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करत होती. अशात या व्यक्तीच्या कानावर एक संभाषण पडलं. हे संभाषण ऐकून ही व्यक्ती हादरली. जे संभाषण ऐकलं, त्यामुळे या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. हे संभाषण होतं, उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं… उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या घराबाहेर मोठं कांड करणार असल्याचं या व्यक्तीने एकलं. ताबडतोब या व्यक्तीने महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला अन् या बाबतची माहिती दिली.
महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या 4 ते 5 मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकलं. या संभाषणातील मुद्दे या व्यक्तीने पोलिसांना कळवले. हे मुस्लिम तरुण उर्दू भाषेत संभाषण करत होते. हे तरुण मोहम्मद अली रोडवर रुम रेंटवर घेणार आहेत, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या घडाबाहेर मोठं काहीतरी घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या घराबाहेर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील डाऊट फुल सरकारची नाही ते सुडाने पेटलेलं सरकार आहे .ज्या पद्धतीने शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात काय घडलं तर याची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची असेल, असं म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.