वेळ ठरली, ठिकाण ठरलं; उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार; लोकसभा निवडणूक लढणार?

Unmesh Patil Inter in Shivsena Uddhav Thackeray Group Tomorrow : भाजपने तिकीट नाकारलं, आता उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणार; उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार... भाजप खासदार ठाकरे गटात प्रवेश करणार कधी होणार पक्षप्रवेश? वाचा सविस्तर.....

वेळ ठरली, ठिकाण ठरलं; उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार; लोकसभा निवडणूक लढणार?
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 3:12 PM

लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.उद्या 12 वाजता भाजप खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवबंधन ते हाती बांधणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाने जळगावात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जळगावातून त्यांची उनेदवारी निश्चित झाल्याचीही माहिती आहे. काही वेळाआधी त्यांनी संजय राऊतांचीही भेट घेतली आहे.

उन्मेश पाटील भाजपमध्ये नाराज

भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि इथूनच उन्मेश पाटील यांची नाराजी सुरू झाली. विद्यमान खासदार असताना पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील नाराज झाले. आता ते उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील. उन्मेश पाटील हे आता जळगाव लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहेत.

उन्मेश पाटील काय म्हणाले?

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटील यांना माध्यमांशी त्यांची भूमिका विचारली. त्यावरमी आरामात माध्यमांशी बोलेन. आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मी उद्या सकाळी तुमच्यासाठी बोलेन. मी तुमचा सगळ्यांचा आदर करतो पण मी तुमच्याशी नंतर बोलेन. मी आणि संजय राऊत साहेब मागच्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकत्र संसदेत होतो. आमची चांगली मैत्री आहे. काही गोष्टी राजकारण पलिकडे असतात. ही भेट तशीच होती, असं उन्मेश पाटील म्हणाले.

जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. शिवाय जळगावमधून उन्मेश पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील,अशी माहिती आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.