Mumbai water cut : मुंबईत आजपासून 10% पाणीकपात! मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन

Mumbai Water Cut from today : पुढचे 35 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आता शिल्लक राहिला आहे.

Mumbai water cut : मुंबईत आजपासून 10% पाणीकपात! मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
पाण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 6:33 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai water cut news) महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आजपासून (27 जून) 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी (Water shortage) जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं धरणक्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मुंबईकरांना सतावू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागेल. आजपासून (27 जून) ही पााणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. आता मान्सूनचा पाऊस जरी दाखल झाला असला, तरिही, पुरेसा पाऊस (Monsoon Update) धरणक्षेत्रात झालेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. सात तलावांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या तलावात किती पाणीसाठा?

  1. मोडकसागर 47078 दशलक्ष लिटर
  2. तानसा 7927 दशलक्ष लिटर
  3. मध्य वैतरणा 18013 दशलक्ष लिटर
  4. भातसा 62446 दशलक्ष लिटर
  5. हे सुद्धा वाचा
  6. विहार 3832 दशलक्ष लिटर
  7. तुलसा 2092 दशलक्ष लिटर

35 दिवस पुरेल इतकंच पाणी

पावसाने दडी मारल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये अवघा 9.77 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढचे 35 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाण्याचं नियोजन करणं क्रमप्राप्त असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय. पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी बीएमसीने सोमवारपासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतलाय.

पावसाची दडी

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. यामधील 27 टक्के पाणी हे पाणी गळतीत वाया जातं. त्यामुळे बहुतांश भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. अशातच जून महिना आता संपत आला आहे आणि मान्सून अजूनही म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही. त्याचा परिणाम मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुवठ्यावर होतोय. त्यामुळे मुंबईकरांनाही पाण्याचा अपव्यय टाळून जपून पाणी वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.