बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी
16 ऑगस्टला धरणांमध्ये तब्बल 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला (Mumbai Water Supply). सध्या मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला, तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या 12 दिवसात पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. 4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. आज 16 ऑगस्टला धरणांमध्ये तब्बल 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा 75.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा पुढील नऊ महिने मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे (Mumbai Water Supply).
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी 3850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात करण्यात आली. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. परंतु तलावांमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने सध्या म्हणजेच 16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे (Mumbai Water Supply).
मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं काठोकाठ भरायला सुमारे चार लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे. सात धरणांपैकी 27 जुलैला तुळशी तर 5 ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत 20 टक्के पाणी कपात केली असली, तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. जर धरण पूर्ण भरली तर मुंबईकरावरील 20 टक्के पाणी कपात कमी होऊ शकते.
मागील दोन वर्षांपेक्षा पाणीसाठा कमीच
- 16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.
- गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 13 लाख 56 हजार 012 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच 93.69 टक्के पाणीसाठा होता.
- आजच्याच दिवशी 2018 मध्ये 12 लाख 99 हजार 658 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच ९८.७९ टक्के पाणीसाठा जमा होता.
16 ऑगस्टपर्यंतचा सातही धरणांतील पाणीसाठा
मुंबईला पाणी पुरवणारी धरणं | 16 ऑगस्ट 2020 पर्यंतचा सातही धरणांतील पाणीसाठा |
---|---|
अप्पर वैतरणा | 1,35,077 दशलक्ष लिटर |
मोडक सागर | 1,16,831 दशलक्ष लिटर |
तानसा | 1,14,013 दशलक्ष लिटर |
मध्य वैतरणा | 1,59,914 दशलक्ष लिटर |
भातसा | 5,36,966 दशलक्ष लिटर |
विहार | 27,698 दशलक्ष लिटर |
तुळशी | 8,046 दशलक्ष लिटर |
एकूण | 10,99,445 दशलक्ष लिटर |
Pune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरलेhttps://t.co/WOPbyOBd90 #Pune #Dam
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2020
Mumbai Water Supply
संबंधित बातम्या :
विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत