Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Weather Forecast : मुंबईत आज रिमझिम, आठवडाभरात हलक्या सरी, काय सांगतं वेधशाळेचं भाकित ?

पावसानंतर कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पेक्षा एक अंशाने कमी होते. आज सांताक्रूझ येथे तापमान 29.2 अंश सेल्सिअस होते. सात दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबईत या आठवड्यात मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

Mumbai Weather Forecast : मुंबईत आज रिमझिम, आठवडाभरात हलक्या सरी, काय सांगतं वेधशाळेचं भाकित ?
मुंबईत आज रिमझिम, आठवडाभरात हलक्या सरीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 2:59 PM

मुंबई – उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना (Mumbai) थोडासा दिलासा मिळाला. मुंबईसह उपनगरात पहाटे सहाच्या सुमारात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत काहीवेळ गारवा निर्माण झाला होता. पाऊस (Mumbai Rain) जरी झाला असला तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दादर, शिवडी, माटुंगा, परळ आणि नवी मुंबईसारख्या लगतच्या भागात पावसाने हजेरी लावली. चालूवर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (Weather department) दिले आहेत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी मान्सुनपूर्व सरी कोसळल्या आहेत. पाऊस लवकर सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांची हातघाई उसळली आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार, 3.4 मिमी पाऊस झाला

सोमवारी रात्री मुंबईत कुलाबा परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, कुलाबा वेधशाळेनुसार, 3.4 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पुढच्या आठवड्यात शहरात हलक्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासात मुंबईत ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी किंवा रात्री हलक्या पद्धतीचा पाऊस होईल. हलक्या पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. सांताक्रूझ वेधशाळेत सकाळी सापेक्ष आर्द्रता 71 टक्के होती, तर कुलाब्यात 87 टक्के होती. पावसाळ्यात सापेक्ष आर्द्रता 90 आणि त्याहून अधिक असते.

28 आणि 29 मे रोजी पाऊस आणि वादळाची शक्यता आहे

पावसानंतर कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पेक्षा एक अंशाने कमी होते. आज सांताक्रूझ येथे तापमान 29.2 अंश सेल्सिअस होते. सात दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबईत या आठवड्यात मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. आठवडाभर ढगाळ आभाळ अपेक्षित असताना, 28 आणि 29 मे रोजी पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात मान्सून 12 जून ते 15 जून या दरम्यान सक्रीय होईल.

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.