Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एसटी उलटली, चालक पसार, कंडक्टर ताब्यात

मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव पुलावर रात्री एसटी बसला अपघात झाला. (Western Express Highway ST Accident)

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एसटी उलटली, चालक पसार, कंडक्टर ताब्यात
Highway Mrityunjay Doot
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 8:10 AM

मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगाव पुलावर एसटी बसला अपघात झाला. अपघातात बस उलटल्याने वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. अपघातानंतर एसटी चालक पसार झाला, तर कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. (Mumbai Western Express Highway ST Bus Accident)

एसटी उलटून एक प्रवासी जखमी

मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव पुलावर रात्री एसटी बसला अपघात झाला. बस दहिसर भागातून मुंबईच्या दिशेने जाताना रस्त्यावरच उलटली. अपघात घडला त्यावेळी एसटी बसमध्ये तिघे जण प्रवास करत होते. यापैकी एक जण जखमी झाला आहे.

चालक पसार, कंडक्टर ताब्यात

अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला, मात्र पोलिसांनी कंडक्टरला ताब्यात घेतलं आहे. एसटीचा नेमका अपघात कसा झाला, याबाबत अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही.

द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

पश्चिम द्रुतगती मार्गावर एसटी बस पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर उलटलेली बस रस्त्यावरुन हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं.

एसटी बस चालकाने अपघातानंतर पोबारा केल्यामुळे अपघाताचं नेमकं कारण समजलेलं नाही. मात्र चालक पळून जाण्याचं कारण काय? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संबंधित बातम्या :

तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू

नंदुरबारमध्ये मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 5 महिलांचा समावेश

(Mumbai Western Express Highway ST Bus Accident)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.