मुंबई : शेजाऱ्यांची भांडण हा तसा आपल्या आजूबाजूला घडणारा नेहमीचाच भाग. मात्र, मुंबईत असंच भांडण एका 53 वर्षीय महिलेला महागात पडलंय. या प्रकरणी या महिलेवर थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. गोरेगावमधील या आरोपी महिलेने आपल्या शेजारच्या 36 वर्षीय महिलेला तिच्या केसांवरुन, कपड्यांवरुन हिणवत वांझ म्हटलं. हा प्रकार वारंवार होत राहिल्याने अखेर पीडित महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यामुळे आरोपी महिलेच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय (Woman insults modesty of neighbour booked in Mumbai).
पीडित महिला एका खासगी कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर काम करते. ती डिसेंबर 2020 मध्ये आरोपी महिलेच्या इमारतीत भाडेकरी म्हणून राहू लागली. त्यावेळी पीडितेने नोकरी करत असल्याने शेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेकडेच जेवणाचा डबा सुरु केला. मात्र, काही दिवसांनी डब्याची चव न आवडल्याने पीडितेने डबा बंद करुन आरोपी महिलेला पैसेही दिले.
यानंतर आरोपी महिला घरी नसताना एक दिवस तिच्या मुलाने रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात गाणे लावले. मध्यरात्री साडेतीन वाजताही हे मोठ्या आवाजातील गाणी सुरुच होती. त्यामुळे पीडित महिलेने 2-3 वेळा संबंधित मुलांना आवाज कमी करण्यास सांगितले. त्यानंतरही आवाज कमी न झाल्याने पीडितेने थेट आरोपी महिलेशीच यावर चर्चा केली. मात्र, याचा राग मनात धरुन आरोपी महिलेने पीडितेवर शेरेबाजी सुरु केली. ही शेरेबाजी तिथंच थांबली नाही, तर आरोपीने पीडितेला इमारतीचा पाठलाग करुन वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी अपमानित केलं. पीडितेवर तिचे कपडे, कमी लांबीचे केस आणि एकटं राहत असल्यावरुन वारंवार शेरेबाजी केली. तसेच आई वडिलांविषयी देखील सार्वजनिक ठिकाणी अपशब्द काढले.
अखेर पीडितेने या सर्व प्रकाराला कंटाळून इमारतीतील एका पोलीस कर्मचाऱ्याला ही बाब सांगितली. त्यांनी पीडितेला 100 क्रमांकावर कॉल करुन तक्रार करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही हा सर्व प्रकार सुरुच राहिला. महिनाभर हा प्रकार सुरु राहिला. मात्र, अखेरीस आरोपीने या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वेश्या म्हणण्यास सुरुवात केली. तसेच तिच्याकडे येणाऱ्या पुरुषांच्या संबंधाने पीडितेची बदनामी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडितेने पोलीस स्टेशन गाठत आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेचे वकील सिद्धेश बोरकर यांनी सांगितलं की पीडितेचा अपमान करणं, सार्वजनिक ठिकाणी चारित्र्यहनन करणं या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
चंद्रपुरात खंडणीविरोधात मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक
‘माझ्याविरोधात साक्ष का दिलीस?’ ठाण्यात पत्त्याच्या कल्बमध्ये तरुणावर चॉपरने सपासप वार
भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला मृतदेह
व्हिडीओ पाहा :
Woman insults modesty of neighbour booked in Mumbai