वरळीत अजितदादा गटाची मोठी खेळी?, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बडा नेता देणार?, भाजप बॅकफूटवर?

Worli NCP Posters For Vidhansabha Election 2024 : मुंबईतील वरळी भागात पोस्टर्स लागले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे? अजितदादा गट वरळीत उतरवणार मोठा नेता? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण... कोणता नेता आदित्य ठाकरेंविरोधात लढणार? वाचा सविस्तर...

वरळीत अजितदादा गटाची मोठी खेळी?, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बडा नेता देणार?, भाजप बॅकफूटवर?
आदित्य ठाकरे, अजित पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 1:57 PM

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार? कोणत्या नेत्याच्या विरोधात कोणता नेता मैदानात असणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच वरळीत आदित्य ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट बडा नेता मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. तशी तयारी सुरु झाल्याचं दिसतं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवतील. जर असं झालं तर आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे.

वरळीत अमोल मिटकरींच्या समर्थनार्थ पोस्टर्स

वरळीमध्ये पोस्टर लागले आहेत. यात अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीचा उल्लेख करण्यात आला आहे. वरळी विधानसभेवर पुन्हा घड्याळ… वरळीतील संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी यांना शुभेच्छा, असे पोस्टर वरळीत लागले आहेत. प्रखर वकृत्व शासनावर पकड अशी त्यांची ओळख… वरळीकरांची पसंत घड्याळ, सामान्य माणसांची पसंत घड्याळ, हीच ती पुन्हा घड्याळ – घड्याळ, असंही पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Amol Mikari Poster

अमोल मिटकरींसाठी वरळीत पोस्टर

2019 ची लढत

2019 पहिल्यांदाच ठाकरे घरातील व्यक्तीने निवडणूक लढली होती. 2019 ला शिवसेनेकडून वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती. आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश माने यांच्यात ही लढत झाली होती. सुरेश माने यांना 21 हजार 821 मतं मिळाली होती. तर आदित्य ठाकरेंना 89 हजार 248 मतं मिळाली होती. 67,427 मतांनी आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती विरूदध महाविकास आघाडी असा सामना राज्यभरात रंगणार आहे. अशातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही असाच सामना होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे मैदानात असतील तर महायुतीकडूनही तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. अमोल मिटकरींना उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.