मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली नसल्याचं समोर आलं आहे. एनसीबीनं याविषयीची माहिती दिल्याचं ट्विट एनएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.
समीर वानखेडे डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते.ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त केलं तर काही संपत्ती देखील जप्त केली.
Mumbai Zonal Director Sameer Wankhede’s tenure to end on 31Dec, he won’t seek an extension. He arrested 96 ppl®istered 28 cases b/w Aug-Dec’20. In 2021,he arrested 234 ppl,registered 117 cases,seized over 1791 kg drugs worth appox Rs 1000cr &froze properties over Rs 11 cr: NCB
— ANI (@ANI) December 17, 2021
समीर वानखेडेंनी एनसीबीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा रिया चक्रवर्तीला अटक केली होती. समीर वानखे़डे यांच्याकडून त्यानंतर दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंग यांना सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनवरुन चौकशीला बोलावण्यात आलं होतं.
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण असल्याचा आरोप समीर वानखेडेंवर केला होता. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांवरुन देखील वाद निर्माण झाला होता.
वानखेडेंनी मुदतवाढ न मागितल्यानं एनसीबीतील कार्यकाळ संपणार
समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस ऑफिसर आहेत. ते सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीमध्ये डेप्युटेशनवर रुजू झाले होते. त्यापूर्वी ते डीआरआयमध्ये कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादांच्यापार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्याकडून मुदतवाढ मागण्यात आली नसल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर
Mumbai Zonal Director Sameer Wankhedes tenure to end on 31Dec