Mumbaikar : पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही

Mumbaikar : पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा
पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:15 AM

मुंबई – राज्यात यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच हवामान खात्याने वर्तविले होते. त्याचबरोबर मान्सून (Mansoon) वेळेआगोदर दाखल होऊल अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु हवामान खात्याचा (weather department) तो अंदाज चुकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. यंदा पाऊस वेळेत दाखल झाला नसला तरी मुंबईकरांना चिंता करण्याचं काहीचं कारण नाही. कारण मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आणि तलावामध्ये जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. विशेष उन्हाळ्यात अनेकदा मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. परंतु यंदा मागच्या तीन वर्षापेक्षा पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. पुढचे 55 दिवस पाणी मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्याचा पाणीसाठा

मोडकसागर – 46639 दशलक्ष लिटर

तानसा – 10859 दशलक्ष लिटर

हे सुद्धा वाचा

मध्य वैतरणा – 44790 दशलक्ष लिटर

भातसा – 104210 दशलक्ष लिटर

विहार – 3645 दशलक्ष लिटर

तुलसी – 2319 दशलक्ष लिटर

27 टक्के पाण्याची गळती होते

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा करत असताना काही भागात पाण्याची गळती होत असल्याचे 27 टक्के पाण्याची गळती होते. त्यामुळे काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. यंदा समाधानकारण पाणी शिल्लक असल्याने पाणी टंचाई करण्यात आलेली नाही.

४०० दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता येणं शक्य

मुंबईत पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी पालिकेकडून प्रकल्प चालविण्यात येणार आहे. मनोरी येथील इस्रायली तंत्रज्ञानाच्या प्रस्तावित खारे पाणी गोडे करणे प्रकल्पात सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर करण्याचं उद्दिष्ट आहे. तर प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दररोज 400 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता केलं जाणार आहे.

या प्रकल्पासाठी ऑगस्टपर्यंत जागतिक निविदा मागवण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.