मास्क न वापरल्यास दुप्पट दंड, मुंबई मनपा आणखी आक्रमक

मुंबई महापालिकेने बेजबाबदार नागरिकांविरोधातील आपली मोहीम आणखी आक्रमक केली आहे.

मास्क न वापरल्यास दुप्पट दंड, मुंबई मनपा आणखी आक्रमक
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 1:42 PM

मुंबई : मुंबई महापालिकेने बेजबाबदार नागरिकांविरोधातील आपली मोहीम आणखी आक्रमक केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना आता दुप्पट दंड ठोठावला जाणार आहे. यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड होता, आता त्यामुळे तितकीच वाढ करुन तो 400 रुपये इतका केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे हे कोरोना रोखण्यासाठीचं आवश्यक सूत्र आहे. मात्र अजूनही काही लोकांना याचं गांभीर्य नाही. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर आणखी कडक कारवाई करण्याचा पवित्रा महापालिकेने घेतला आहे. (Mumbaikars will have to pay double fine if they walk without a mask)

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र काही मुंबईकर बेजबाबदारपणे मास्कशिवाय रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा बेशिस्त, बेजबाबदार व्यक्तींमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ही दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने आतापर्यंत 31 हजार 500 पेक्षा अधिक विनामास्क नागरिकांना पकडून, त्यांच्याकडून 87 लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय रस्त्यावर थुंकणाऱ्या1607 नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 3 लाख 31 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Mumbaikars will have to pay double fine if they walkwithout a mask)

मुंबईतील कोरोनाची सध्यस्थिती

12 ऑक्टोबर, सायंकाळी 6:00 वाजता 24 तासात बरे झालेले रुग्ण- 1,968 आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- 1,95,773 बरे झालेल्या रुग्णांचा दर- 84% एकूण सक्रिय रुग्ण- 22,693 कोव्हिड रुग्ण संसर्गाचा दर (5 ऑक्टोबर-11 ऑक्टोबर)- 1.00

भारतात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

गेल्या काही दिवसांपासून जगातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झालेल्या भारतातील परिस्थिती आता सुधारण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण, सोमवारच्या आकडेवारीनुसार 63 दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. सोमवारी देशात कोरोनाच्या 53,082 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 10 ऑगस्टनंतर देशात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या इतकी खाली आली आहे.

संबंधित बातम्या

आनंदाची बातमी: भारतात 63 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

(Mumbaikars will have to pay double fine if they walk without a mask)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.