मुंबईची पहिली भूयारी रेल्वे या तारखेपासून धावणार, मार्ग, वेळ आणि स्थानकं तसेच इतर माहिती चेक करा

कुलाबा - बीकेसी - सिप्झ या मार्गावरील मुंबईतील पहिल्या भूयारी रेल्वेचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांची ट्रॅफीक जाममधून काहीशी सूटका होणार आहे.

मुंबईची पहिली भूयारी रेल्वे या तारखेपासून धावणार, मार्ग, वेळ आणि स्थानकं तसेच इतर माहिती चेक करा
aarey metro
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 8:27 PM

मुंबईतील भूयारी मेट्रो – 3 कुलाबा- बीकेसी-सिप्झ हीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. 33.5 किमीची ही अंडरग्राऊंड रेल्वे लवकरच धावणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या प्रकल्पासाठी 37,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून या मेट्रोच्या कारशेडकरीता आरे येथील झालेल्या झाडांच्या कत्तलीवरुन देखील वाद निर्माण झाला होता. या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा येत्या जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांची  ‘कनेक्टेट टू अनकनेक्ट’ अशा 27 रेल्वे स्थानकांशी जोडलेल्या मेट्रो मार्गिकेमुळे ट्रॅफीक जामच्या कटीकटीतून सुटका येणार आहे.

मुंबईच्या पहिल्या भुयारी रेल्वेचे नाव अॅक्वा लाईन असे ठेवण्यात आले असून आरे तून या मार्गाची सुरुवात होते. 33.5 किमीच्या या मार्गावर 27 स्थानके असून त्यातील 26 स्थानके भुयारी आहेत. या मार्गिकेसाठी बोगदे खणण्याच्या कामासाठी साल 2017 मध्ये सुरुवात झाली होती. परंतू कोविड-19 आणि कारशेडच्या वादामुळे या प्रकल्पाला फटका बसला. या भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरु होणार असून आरे कॉलनी ते बीकेसी ( वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स ) या टप्प्यातील वाहतूक सुरु केली जाणार आहे. मुंबईतील तीन मेट्रो मार्ग सध्या सुरु आहेत. त्यात एकाची भर पडणार आहे.

पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचे वेळापत्रक

पहिली अंडरग्राऊंड मेट्रोवर 260 फेऱ्या दररोज चालविल्या जणार आहेत. सकाळी 6.30 ते रात्री 11.00 पर्यंत या फेऱ्या चालविल्या जाणार असून रस्ते मार्गापेक्षा मेट्रोमुळे वेळेची बचत होणार आहे. ही मेट्रो दर ताशी 90 किमी वेगाने धावणार आहे. 35 किमीच्या यामार्गाला रस्त्याने 2 तास लागतात, तोच प्रवास मेट्रोने 50 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

पहिल्या भूयारी मेट्रोची स्थानके

कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सहार देशांतर्गत विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, MIDC, SEEPZ आणि आरे डेपो अशी 27 स्थानके या भूयारी मेट्रोला आहेत. भूयारी मेट्रोचा बीकेसी ते आरे हा पहिला टप्पा जुलैमध्ये सुरु होणार आहे. परंतू संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी आठ महिन्याचा कालावधी लागणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.