मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो केव्हा धावणार?, मुंबईकरांची वाढली उत्सुकता

मुंबईतील मेट्रो - 3 हा कुलाबा - बीकेसी - सिप्झ असा 33 किमीचा भूयारी मार्ग आहे. ही मुंबईतील पहिली भूयारी मेट्रो असून तिच्यामुळे मुंबईतील ट्रॅफीकची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो केव्हा धावणार?, मुंबईकरांची वाढली उत्सुकता
MMRC has successfully completed Research Designs and Standards Organisation #RDSO trials of Rolling Stock for #MetroLine3Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 5:17 PM

मुंबईतील पहिली भूयारी रेल्वे लवकरच सुरु होत आहे. कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी अशा भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे.  त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आनंदाची बातमी मिळणार आहे. मुंबईची पहीली भूमिगत मेट्रो ( (Aqua Line ) लवकरच सुरु होत आहे. या शहराच्या वेगाला या भूयारी मेट्रोमुळे नवा पर्याय मिळणार आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची टर्म संपत आहे. त्याआधी निवडणूका जाहीर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जुलैअखेर किंवा 15 ऑगस्टचा मुहूर्त साधून मेट्रोचा पहिला टप्पा सुरु केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.

मुंबईतील मेट्रो – 3 हा कुलाबा – बीकेसी – सिप्झ असा 33 किमीचा भूयारी मार्ग आहे. या मेट्रोचा पहिला बीकेसी ते आरे असा टप्पा तयार असून त्याचे उद्घाटन लवकरच होऊ घातले आहे. मुंबई मेट्रो तीनची आरडीएसओची ट्रायल 24 जून रोजी पार पडली होती. या मेट्रोचा बीकेसी ते आरे कॉलनीचा पहिला टप्पा आता प्रवाशांच्यासाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो तीनचा मार्गिकेसाठी आरे कॉलनीतील कारशेडचा मुद्दा चांगलाच वादात सापडला होता. या पर्यावरणवादी तसेच कोर्टात प्रकरण गेल्यानंतर आणि कोरोना साथ या अनेक अडचणींमुळे कारशेड उभारण्यासाठी बराच वेळ खर्ची पडला. त्यामुळे इतक्या संकटातून मुंबईची मेट्रो तीन हा भूयारी मेट्रोचा पर्याय मुंबईकरांना आता मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत रेल्वे आणि मेट्रोशी कनेक्टेट नसलेला भाग प्रथमच मेट्रो मार्गिकांशी जुळला जाणार आहे. भूयारी मार्गिकेत एकूण 27 स्थानके आहेत.

सकाळी केले ट्वीट नंतर केले डिलीट

मुंबईच्या भूयारी मेट्रोचा बीकेसी ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा येत्या 24 जुलै रोजी सुरु होणार असे एक्स माध्यमावर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पोस्ट टाकत जाहीर केले होते. त्यानंतर या पोस्टवर अनेक प्रतिक्रीया आल्या. अनेकांनी तर विनोद तावडे हेच आता पुढील मुख्यमंत्री असतील असे म्हटले. या ट्वीटमध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते भूयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले होते. मात्र काही तासांनंतर हे ट्वीट विनोद तावडे यांनी रदद् केले.

भूयारी मेट्रो चाचणीचा व्हिडीओ येथे पाहा –

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.